काँग्रेस च्या उमेदवारावर गुन्हा दाखल : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात खळबळ : - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

काँग्रेस च्या उमेदवारावर गुन्हा दाखल : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात खळबळ :

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (विशेष प्रतिनिधी);

कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार यांच्या विरोधात रामनगर पोलीस स्टेशन मध्ये निवडणूक आयोग कडून तक्रार दाखल.


चंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रा साठी शिवसेनेतून काँग्रेस मध्ये नुकतेच प्रवेश घेऊन आलेल्या उमेदवार यांच्या विरोधात रामनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला  आहे.त्यामुळे चंद्रपुर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. 

निवडणूक आयोगानी कांग्रेस चे उमेदवार यांना 5 एप्रिल 2019 रोजी प्रचार करण्यासाठी अनुमती दिली होती. त्यामध्ये कांग्रेस चे उमेदवार यांनी 111 बिना अनुमती वाहनांनी प्रचार केल्या प्रकरणी निवडणूक आयोग तर्फे फिरतं पथक कडुन विडियों चित्र फित करून पुराव्यानिशी रामनगर पोलीस स्टेशन मध्ये 566/2019 नुसार भारतीय दंड 171 एच कलम नुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

या संपुर्ण प्रकरणात काँग्रेस चे उमेदवार यांच्या वर पोलीस काय भुमिका घेतली याकडे सर्वाचा लक्ष्य वेधलं आहे.