खबरकट्टा / चंद्रपूर (राजुरा) :
स्थानिक इंफॅन्ट जीजस शाळेत घडलेल्या अमानुष कृत्यांमुळे आज सर्वत्र रोष व्यक्त होताना दिसत आहे. विविध सामाजिक , महिला संघटनांनी पोलीस निरीक्षक गायगोले तथा एस डी पी ओ शेखर देशमुख यांचे कडे आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या करिता निवेदन सादर करीत घटनेचा निषेध नोंदवला आहे.
संबंधित घटना ही खरोखरच हृदय हलवणारी आहे त्या मुळे जनसामान्यांत रोष दिसत आहे आणि या पुढे असे दुष्कृत्य राजुरा तथा परिसरात कुठे होऊ नये या साठी विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन निषेध दर्शविण्याकरिता आज सायंकाळी 4:30 वाजता भवानी मंदिर - गांधी चौक- जुना बस स्टँड - पंचायत समिती चौक असा निषेध मार्च काढण्यात येत आहे.