सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम फक्त भाजपा सरकार करू शकते : गडचांदूर येथील विजय संकल्प सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम फक्त भाजपा सरकार करू शकते : गडचांदूर येथील विजय संकल्प सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (गडचांदूर):

कांग्रेस ने गरिबी हटाव चा नारा दिला परंतु सामान्य जनतेची गरिबी हटली नाही.पंतप्रधान मोदी यांनी  नवीन व्यवस्था निर्माण करून गोर गरीब जनतेच्या खात्यात जमा होऊ लागली 55 टक्के देशात शौचालय नव्हते तेव्हा स्वच्छ भारत योजने अंतर्गत योजना सुरू केली आज 98 टक्के कुटुंबात शौचालय झाले.

उजवला गॅस योजना आणून 5 कोटी कुटूंबात देण्यात आली.उजाला योजने अंतर्गत प्रत्येक कुटूंबात वीज दिली.5 वर्षात 5 कोटी घरे दिली.

राज्यात अतिक्रमण धारकांना पट्टा देऊन सव्वा लाख रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आदिवासी ,गैर आदिवासी यांना पट्टा देण्याची योजना आणली आयुष्यमान योजना आणली  अनेक लोकोपयोगी योजना आणून विकास केलेला आहे.

कांग्रेस चा जाहीरनामा 1 एप्रिल ला देत जनतेला उलू बनविन्याचे काम करीत असल्याचे सांगत गरीब ,सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात असे सांगत आज पंतप्रधान यांनी देशातील प्रत्येक शेतकऱ्याला पेंशन व 1लाखांपर्यंतचे कर्ज 5वर्षाकरिता बिनव्याजी देणार असल्याचे सांगितले.

कर्जमाफी माध्यमातून मोठया प्रमाणात लाभ मिळाला .जो पर्यत शेवट चा शेतकरी कर्ज मुक्त होणार नाही तो पर्यत कर्ज माफी सुरू राहील . नवीन भारत तयार करायचे आहे .आतंकवादी बिमोड करण्यासाठी मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक करून उडी ,पुलवामा चा बदला घेतला 
  
कांग्रेस चा जाहीरनाम्यात आमचं सरकार आल्यास 124 कलम काढून टाकू ही कलम देशद्रोही संबंधात आहे . मोदीच्या बलशाली भारत घडविण्यासाठी चंद्रपूर वणी आर्णी क्षेत्रातून उमेदवार हंसराज अहीर यांना विजयी करण्याचे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केले.

प्रस्तावना राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार ऍड संजय धोटे यांनी केले व भाजपा उमेदवार हंसराज अहीर यांनी आपली भूमिका मांडली. 

सभेला  भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा बल्लारपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे ,राजुरा विधानसभा संपर्क प्रमुख खुशाल बोन्डे ,ओबीसी महासंघ तथा चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अशोक जिवतोडे ,रीपाइ आठवले गटाचे नेते सिदार्थ पथाडे, शिवसेना नेते नितीन पिपरे ,डॉ मंगेश गुलवाडे ,भाजपा युवा मोर्चा सचिव महेश देवकते,सचिन डोहे ,आशिष ताजने सहित पक्षाचे अनेक कार्यकर्ते व गडचांदूर ,जिवती,  कोरपना येथील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते .