निविदा न काढताच गोंडपिपरी नागरपंचायतीची 97.55 लाखांची विकासकामे सुरु : जिल्हाधीकाऱ्याकडे तक्रार दाखल होऊनही अजूनही कारवाही नाही : 30 टक्के बांधकाम पूर्ण : भ्रष्टाचारावर कारवाही लक्षवेधी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

निविदा न काढताच गोंडपिपरी नागरपंचायतीची 97.55 लाखांची विकासकामे सुरु : जिल्हाधीकाऱ्याकडे तक्रार दाखल होऊनही अजूनही कारवाही नाही : 30 टक्के बांधकाम पूर्ण : भ्रष्टाचारावर कारवाही लक्षवेधी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (गोंडपिपरी प्रतिनिधी ):

गोंडपिपरी नगर पंचायत क्षेत्रातील विकास कामासाठी शासनाकडून  वैशिष्ट्य पूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजने अंतर्गत 2010- 17 ला  10कोटी रुपये  अनुदान चंद्रपूर जिल्हा पालकमंत्र्यांनी मंजूर केले  होते.


त्यातून 9 कोटी 86 लाख रुपयाची कामे मंजूर करून ती कामे अंतिम टप्प्यात असताना त्या 10 कोटी रुपयांच्या अनुदानातून शिल्लक राहिलेली जवळ पास 1 कोटी रूपया पैकी 97.55 लाखाची कामे निविदा न काढता परस्पर नगरसेवकांमार्फत सुरु असून त्या पैकी 30 टक्के कामे पूर्ण झालेली असल्याने हा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊन शासन-प्रशासनात खडबड उडाली आहे. 

या संदर्भात विद्यमान नगराध्यक्षा  अनभिज्ञ  असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हे मोहगम  उत्तरे देऊन प्रश्न विचारनाऱ्यांची  बोळवन करीत आहेत. ज्या अर्थी     97.44 लाखाच्या कामाची प्रशासकिय मंजुरी 8 मार्च 2019 ला घेतली असल्याने त्या कामाची निविदा काढने  व ती निविदा जाहिरात वृत्त पत्रात  प्रकाशीत करणे आवश्यक होते.

परंतु सर्व नियम धाब्यावर बसवून गोंडपिपरी नगर पंचायत चे सत्ताधारी नगरसेवक यांनी जुन्याच कंत्राटदाराच्या नावे नवीन काम सुरु  असल्याचे दाखवून स्वतःच ती कामे करीत असल्याचे एका ऑडिओ क्लिप मध्ये कबुली दिली आहे  व  सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांचेकडून कुठलेही ठोस उत्तर मिळत नसल्याने 97.55लाख रुपयाची कामे बेकायदेशीर होत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फ़े  जिल्हाधिकारी ,सार्वजनिक बांधकाम अभियंता ,कार्यकारी अभियंता यांना तक्रारी दिल्या होत्या. परंतु आतापर्यंत या प्रकरणात कोणतीही  कारवाही झाली नसल्याने लाखो रुपयाचा भ्रष्टाचार होत असल्याचे दिसत आहे.  

सदर कामकाजात कोणतीही निविदा काढण्यात आली नसून फक्त जुन्याच कंत्राटदाराला काम दिले असल्याचा आव आणून 30लाखाची प्रत्यक्ष  कामेही उरकण्यात आली आहे.या गंभीर भ्रष्टाचार प्रकरणात मनसे ने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून पत्रकार परिषद घेऊन अनेक दैनिक वुत्तपत्रांमध्ये बातमी झडकल्यावर एका नगरसेवकाची मी स्वतः काम घेतले असल्याची ऑडिओ क्लिप सुद्धा सोसिअल मीडिया वर फिरत होती.

त्यामुळे सध्या काम थांबविण्यात आले असून सदर कामाचा जुना प्रस्ताव व 8 मार्च 2019ला मंजुरी मिळालेल्या कामाच्या प्रस्तावातील फरक आगमीत करून जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरी साठी टाकण्याचा प्रयत्न असेल असे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर काम घेणाऱ्या नागसेवकापैकीच एका नगरसेवकाने प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. 

वास्तविक बघता पालकमंत्र्यांनी गोंडपिपरी नगर विकासाकरिता 10कोटी विशेष निधी देऊनही काही नगरसेवकांच्या दुटप्पी व भ्रष्टाचारी धोरणामुळे आधी पाणी पुरवठा व आता बांधकामाच्या विकास कामांना ग्रहण लागले आहे.  त्यामुळे विकास कामांचा खोळंबा होत आहे अशी नगरातील अनेक नागरिकांची तक्रार असून हा भ्रष्टाचार असाच सुरु राहिला तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू - एक प्रतिष्ठित तव्यापारी गोंडपिपरी 

परंतु उर्वरित रकमेच्या प्रस्तावातील हा फरक जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी जरी गेला तरी निविदा न काढता बांधकाम कामे करनाऱ्या कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागावर काय कारवाही केल्या जाईल हे लक्षवेधी राहील.