चंद्रपूर जिल्ह्यात ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसमधून 8 लाख 30 हजाराची रोकड ताब्यात : लोकसभेच्या लक्ष्मीदर्शनाची रोकड असल्याचा संशय - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्ह्यात ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसमधून 8 लाख 30 हजाराची रोकड ताब्यात : लोकसभेच्या लक्ष्मीदर्शनाची रोकड असल्याचा संशय

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना लक्ष्मीदर्शन घडवण्याचा प्रयत्न होण्याची दाट शक्यता आहे. ही शक्यता ओळखूनच निवडणूक आयोगाने देशभरात गाड्यांची कसून तपासणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. 

चंद्रपूर जिल्ह्यात ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसमधून 8 लाख 30 हजार कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे. वरोरा येथील तंबाखू विक्रेते आणि महाराष्ट्र राज्य लॉटरी चे विक्रेता अनिल फुलचंद शर्मा यांच्याकडून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.


निवडणुकीच्या काळामध्ये गरजेपेक्षा जास्त रक्कम जवळ बाळगल्यास त्या रकमेबाबत चौकशी करण्यात येत आहे. वरोरा येथून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स मधून संशयास्पद रक्कम नेली जाणार असल्याची माहिती वरोरा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरोरा पोलिसांनी खाबांडा भागात ही बस अडवली आणि त्याची तपासणी केली. तपासणीदरम्यान अनिल शर्मा यांचेकडे ही रक्कम आढळून आली. ही रक्कम जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.