गोंडपिपरीत 52वर्षांपासून गावठाण अतिक्रमण धारकांना पट्टे न दिल्यास आंदोलन छेडू : नगराध्यक्षा सहित अतिक्रमण धारकांचा एल्गार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गोंडपिपरीत 52वर्षांपासून गावठाण अतिक्रमण धारकांना पट्टे न दिल्यास आंदोलन छेडू : नगराध्यक्षा सहित अतिक्रमण धारकांचा एल्गार

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (गोंडपिपरी शहर प्रतिनिधी):

गोंडपिपरी शहरातील गावठाण अतिक्रमणाचे प्रकरण गेल्या 52वर्षांपासून प्रलंबित असून, यावर तातडीने पट्टे न देण्यात आल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा अतिक्रमण धारकांसहित  नगराध्यक्षा सपनाताई साकलवार व नगरसेवक प्रवीण नरहरशेट्टीवार यांनी उपविभागीय अधिकारी, गोंडपिपरी यांना सुपुर्त करण्याकरिता तहसीलदार सीमा गजभिये यांना दिले आहे.


               

सन 1966-67 पासून तेव्हा गोंडपिपरी जवळ असलेल्या राममंदिर परिसरातील 60 पेक्षा अधिक गोरगरीब कुटुंबीयांनी अतिक्रम करून झोपड्या बांधल्या होत्या, तेव्हापासून आजतागायत 52वर्षाचा काळ लोटूनही, सतत शासनाचा अतिक्रमण प्रचलित धोरणाचा पाठपुरावा करून  या कुटुंबीयांनी मागणी उचलून धरली होती.

याची दाखल घेऊन महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई यांनी सदर प्रकरण निकाली काढण्याचे आदेश 23एप्रिल 1999ला दिले होते त्या अनुषंगाने 19मे 1999 ला तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार गोंडपिपरी यांना पत्रान्वये आदेश दिल्यावर या कुटुंबियांकडून दंडाची रक्कम वसूलही करण्यात आली असून त्यांच्या नवे गाव नमुना 8 नोंद झालेली असूनही त्याचे पट्टेधारक म्हणून अजपावेतो  सातबारा परिवर्तित झाले नाही.

या अतिक्रमधाऱ्यांचा संघर्ष दोन पिढ्यांपासून चालत असून,  गोरगरीब लोकांना शासनाच्या वतीने पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुले मंजूर झाली असून ,जमिनीची कागदपत्रे नसल्यामुळे यांना योजनेपासून वंचित रहावे लागत आहे  - सपनाताई साकलवार, नगराध्यक्षा, गोंडपिपरी. 

25 मे 2019पर्यंत यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास सर्व कुटुंबियांसहित तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय.