चंद्रपूर नागपूर महामार्गावर भरधाव वाहनात आगीचा भडका : आजही उष्णतेचा पारा 46.4% कायम - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर नागपूर महामार्गावर भरधाव वाहनात आगीचा भडका : आजही उष्णतेचा पारा 46.4% कायम

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूर नागपूर महामार्गावर असलेल्या पार्श्व होंडा शोरूम समोर आज सायंकाळी 6:50 वाजता च्या आसपास रोड वरून भरधाव जाणाऱ्या टाटापिकअप वाहनाला अचानक भडका उडून आग लागली. भडक्याचा आवाज होताच चालकाने वाहन जैसे थे स्थितीत थांबवून वाहनाच्या बाहेर उडी घेतल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

चंद्रपुरात आजही उष्णतेचा 46.4चा उच्चांक असून अधिक उष्णमानाने भरधाव जाणाऱ्या वाहनाच्या इंजिन ने गरम होऊन पेट घेतला असावा असा कयास लावला जात आहे. अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहोचले असून त्वरित आग आटोक्यात आणण्यास कर्मचाऱ्यांना यश मिळाले परंतु रहदारीचा मात्र खोळंबा झाला होता