अखेर ठाणेदार आळंदे निलंबित: कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी अजूनही प्रलंबित :मनसे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अखेर ठाणेदार आळंदे निलंबित: कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी अजूनही प्रलंबित :मनसे

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (जिवती प्रतिनिधी ):

जीवती तालुका हा दुर्गम अतिदुर्गम आदिवासी बहुल क्षेत्र असून येथील ग्रामस्थ शेतीसह छोटी-मोठी कामं करून उपजीविका करतात.  पिट्टी गुडा हे तालुक्यातील उपपोलीस स्टेशन  असून तिथे आळंदे  नावाचे ठाणेदार काही दिवसांपूर्वीच रुजू झालेले, दिनांक 27 एप्रिलला त्या पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आंबेझरी गावात देविदास कंदलवार नावाचा इसम दारू पिऊन धिंगाणा घालत आहे अशी माहिती मिळताच ठाणेदार आळंदे काही पोलिस शिपायासह तिथे पोहोचले त्यावेळी जवळपास रात्रीचे अकरा वाजले होते. ठाणेदार आळंदे यांनी कुठलीही चौकशी न करता देविदास यांच्या घरात घुसून त्याला जबर मारहाण केली व त्याला बाहेर काढून स्वतःच्या खिशात असलेल्या धारदार चाकूने त्याच्या डोक्यावरील  केसासह चामडी बाहेर काढून डोक्यावर घाव दिला. 


त्यादरम्यान त्याची पत्नी मला मधात  आल्यानंतर तिला पण मारहाण करण्यात आली. त्यावेळी गावातील काही नागरिक बघावयास आले असता आळंदे यांनी गंभीर जखमी झालेल्या  देविदास ला  रात्री बारा वाजता गडचांदुर ग्रामीण रुग्णालय रुग्णालय भरती केले होते. पण त्यांनी देविदास व त्याच्या पत्नीला भरती केल्यानंतर बेवारस सोडून दिले. ही माहिती मिळताच मनसेचे कार्यकर्ते यांनी  रुग्णालय गाठून  पोलीस पीडित देविदास ची विचारपूस केली. 

त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी आवारपूर यांना माहिती देऊन या प्रकरणांमध्ये  दोषी पोलीस अधिकारी आळंदे यांचेवर गुन्हे दाखल करा अशी मागणी लावून धरली. त्यावेळी स्वतः उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे जखमींची भेट घेतली आणि मनसे कार्यकर्ते व गावातील प्रत्यक्षदर्शी यांच्या  विनंतीवरून  देविदास कंदलवार  व त्याच्या पत्नीला जिल्हा ग्रामीण रुग्णालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आले. परंतु दोन दिवस लोटून सुद्धा आळंदे  ठाणेदार यांच्यावर केवळ 324 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. 

त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू कुकडे यांच्या  नेतृत्वात पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन ठाणेदार आळंदे  यांच्यावर कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करुन अटक करा. गंभीर जखमीच्या परिवाराला आर्थिक नुकसान भरपाई द्या.इत्यादी मागण्या केल्या. या निवेदनात असे म्हटले आहे की ठाणेदार आळंदे  यांनी अमानुषपणे कंदलवार पती-पत्नीला बेदम मारहाण करून देविदास कंदलवार यांच्या डॊक्यावरती धारदार चाकूने चामडी व केस कापून रस्त्यावर फेकून दिली. हा प्रकार अतिशय गंभीर असून कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्या पोलिस विभागाकडे आहे तेच पोलीस जर गुंडागर्दी करीत असेल व जनतेच्या जीवाशी खेळत असेल तर पोलिस विभागाच्या मानवी संवेदना संपल्या की काय असेच एकूण या प्रकरणावरून दिसते.

त्यामुळे या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ स्तरावर करून ठाणेदार आळंदे यांच्यावर कलम 307 व अन्य कलमान्वये गुन्हे दाखल करावे व त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी गंभीर गुन्हे दाखल करावे आणि कंदलवार परिवाराला नुकसान भरपाई देण्यात यावी. 

अशी मागणी करण्यात आली होती अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पोलीस प्रशासनाच्या या दडपशाहीविरोधात मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसेचे राजू कुकडे यांनी दिला. याप्रसंगी मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आमच्या  मागणीवर तात्काळ कार्यवाही करीत चंद्रपूर पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी निलंबन जरी केले असले तरीही या गंभीर गुन्ह्यात फक्त मारधाडीची कलम लावून का पडदा पाडण्यात येत आहे प्रश्नचिन्ह आहे.- राजू कुकडे,  मनसे जिल्हा संघटक.