अवघ्या तीन तासात दुर्गापूर पोलीस पथकाने पकडले बॅटरी चोर :3 आरोपी अटकेत, 40हजाराचा मुद्देमाल जप्त - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अवघ्या तीन तासात दुर्गापूर पोलीस पथकाने पकडले बॅटरी चोर :3 आरोपी अटकेत, 40हजाराचा मुद्देमाल जप्त

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

पोलीस स्टेशन दुर्गापुर येथे फिर्यादी नामे भदुजी गुंजेकर (वय 57 वर्ष) धंदा नोकरी डब्लू सि एल दुर्गापूर रा शक्तीनगर कॉलनी कॉ न एम 184 दुर्गापूर यांनी पोलीस स्टेशन दुर्गापूर ला काल दिनांक 13/04/2019 चे  रात्री दरम्यान डब्लू सि एल दुर्गापूर परिसरातील एका गोदामामध्ये Exide power बॅटरी चोरी गेल्याची तक्रार दाखल केली असता तात्काळ तपास करत अवघ्या तीन तासात आरोपीला अटक करण्यात दुर्गापूर पोलीस पथकाला यश मिळाले आहे. 
            

फिर्यादीचे लेखी तक्रारी वरून पो स्टे दुर्गापूर अप क्रमांक 109/2019 कलम 461/380 भादवी चा गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्हा बाबत मा पोलीस अधीक्षक श्री महेश्वरी रेड्डी साहेब मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री खैरे साहेब मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शीलवंत नांदेडकर साहेब चंद्रपूर यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे पो स्टे दुर्गापूर यांनी विशेष पो उपनी गणेश झाबरे  पो हवा सुनील गौरकार  अशोक मंजूळकर रजनी कांत पुठ्ठावार नापोशी उमेश वाघमारे  सुनील मेश्राम पोशी संतोष आडे यांना नेमण्यात आले सदर पथकानी आरोपी नामे अयुब शेख युसूफ शेख (वय 30 ) रा दुर्गापूर कोढी वार्ड क्र. 5 चंद्रपूर, कैलाश बाजीराव बावनथडे (वय  36), समता नगर वार्ड क्र. 6 ऊर्जानगर चंद्रपूर, देवेंद्र महादेव गेडाम (वय  19) रा. दुर्गापूर वार्ड 4 भीमनगर ,चंद्रपूर यांना अटक करून आरोपी कडून Exide powerSafe plus  Daiphus 12 वाटचे एकूण 8 नग बॅटरी 40000 रु चा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा काही तासात उघडकिस आणून उल्लेखनिय कामगिरी केली आहे.