बल्लारपूर बस स्थानक व रेल्वे जंकशन वर लागणार इलेक्ट्रिक वेळापत्रक बोर्ड :नागपूर मध्य रेल्वे DRUCC सदस्य अजय दुबे यांची संकल्पना - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बल्लारपूर बस स्थानक व रेल्वे जंकशन वर लागणार इलेक्ट्रिक वेळापत्रक बोर्ड :नागपूर मध्य रेल्वे DRUCC सदस्य अजय दुबे यांची संकल्पना

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर:

बल्लारपूर येथील नवीन बस स्थानकावर प्रवाश्यांच्या सोयीकरिता रेल्वे व बल्लारपूर रेल्वे जंकशन वर महामंडळाच्या एस टी बसेस चे इलेक्ट्रिक वेळापत्रक बोर्ड लावण्याची मागणी मध्य रेल्वे नागपूर चे DRUCC सदस्य अजय दुबे यांनी वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर केले. यावेळी बामणी चे सरपंच सुभाष ताजने प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी याची दखल घेत तात्काळ मागणी मंजूर केली व व संबंधित अधिकाऱ्यांना वेळापत्रक इलेक्ट्रिक बोर्ड करतील अंदाजपत्रक बनवून प्रतिष्टित वितकारांच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.

या मुळे वेळापत्रकामुळे दोन्ही स्थानकावरील प्रवाश्याना व दररोज ये जा करणाऱ्या नोकरवर्गाना प्रवास करताना अधिक सुलभता होईल.