जिवती तालुक्यात सर्वच पक्षांना खिंडार : " चलो संघटना अभियान " यशस्वी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिवती तालुक्यात सर्वच पक्षांना खिंडार : " चलो संघटना अभियान " यशस्वी

Share This
- दहा गावातील दोनशे प्रमुख कार्यकर्त्यांचा शेतकरी संघटनेत प्रवेश

खबरकट्टा /(चंद्रपूर - जिवती, २५मार्च) -
          
जिवती तालुक्यातील दहा गावातील भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व मनसेच्या एकुण दोनशे कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला आहे. गेल्या चार महिण्यापासुन शेतकरी संघटनेत इनकमिंग सुरुच असुन प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते व माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी लाल बिल्ला लावून स्वागत केले.

            
केंद्र व राज्यातील सत्तारुढ भाजप प्रणित सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकांची आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाच्या अगतिक धोरणांची चिरफाड करीत शेतकरी संघटनेने जिवती तालुक्यात " चलो संघटना अभियान "  राबविले. यावेळी जिवती तालुक्यातील सोरेकसा, खडकी, रायपूर, कल्लीगुडा, मारोतीगुडा, महाराजगुडा, केकेझरी, दमपूर मोहदा, माथाडी, धोंडामांडवा या दहा गावात गावांत सभा झाल्या. 

या सभांना माजी आमदार अँड. वामनराव चटप,प्रभाकर दिवे,निळकंठ कोरांगे, प्रभाकर ढवस, बबन उरकुडे,रमेश पुरी, शब्बीर जागीरदार,देविदास वारे,श्रीपत सोडनार,नरसिंग हामणे,उध्दव गोतावळे,वैजनाथ सावरगावे इ.प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी शेकडो कार्यकर्ते, युवक व महिला यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश घेतला.यात मारोतीगुडा येथील सरपंच नानाजी मडावी, मनसेचे उपतालुका प्रमुख पंडीत खारटे यांचेसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

     
सोरेकसा येथील गणेश कोटनाके, सागर कोटनाके,यशवंत आत्राम,महादेव मडावी, ज्याेती कोटनाके, देवासा कन्नाके  यांचेसह कार्यकर्ते, खडकी येथील जैतू कोडापे, उत्तम मडावी, पग्गु मडावी, आनंद शिडाम, शिवाजी कोडापे, मुताबाई मडावी यांचेसह कार्यकर्ते, रायपूर येथील झाडू कोडापे, सोमाजी शिडाम,भिमा कुमरे यांचेसह कार्यकर्ते, कल्लीगुडा येथील रामा कोडापे,तुकाराम कुमरे,लेतू आत्राम, आयू सोयाम यांचेसह कार्यकर्ते, मारोतीगुडा येथील सरपंच नानाजी मडावी यांचेसह कार्यकर्ते, महाराजगुडा येथील रवि चव्हाण, बाबुराव राठोड,रामधन चव्हान चंदर जाधव, पांडूरंग राठोड, शेख बासुमिया, लहू पवार, शांता राठोड, शशीकला चव्हाण,सविता जाधव,सय्यद अमीरो सै. शिकंदर यांचेसह कार्यकर्ते, केकेझरी येथील अण्णाराव मोरे,दिगंबर बुदळे,धर्मराज मोरे,ज्ञानोबा दासरे,बाबु भोगे,कमलाकर सुर्यवंशी, धोंडीराम भोगे यांचेसह कार्यकर्ते, दमपूर मोहदा व लभानगुडा येथील नामदेव राठोड,मधुकर राठोड,आशिष बरगेवार, दिगंबर मुळे, चरणदास पवार,विष्णु पवार,राम चव्हाण, मधुकर हरगेवार, भाऊराव सबरवाड यांचेसह कार्यकर्ते, माथाडी येथील दत्ता थाडगे,शिवाजी आडे, पंडीत खारटे,बाळु वाघमारे,केला वाघमारे, भिमराव आडे,मारोती जाधव, संतोष शिंदे यांचेसह कार्यकर्ते आणि धोंडामांडवा येथील अनेक कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.
      
यावेळी अँड. वामनराव चटप यांचे भाषण झाले. जिवती तालुक्यातील नागरीक सरकारी शेतकरी विरोधी धोरणे समजून घेत आपल्या हितासाठी जागृत होत असल्याने हे मोठे परिवर्तन असल्याचे मत मांडले.या सर्व सभांना नागरीक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.