कोरपना तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे १८३ प्रकरणे मंजूर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरपना तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे १८३ प्रकरणे मंजूर

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (कोरपना प्रतिनिधी):
     
कोरपना तालुका संजय गांधी निराधार योजनेची बैठक संपन्न झाली असून सदर योजनेत तालुक्यातील १८३ संजय गांधी निराधार योजनेचे प्रकरण मंजूर करण्यात आले.सदर बैठक समितीचे अध्यक्ष संजय मुसळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.कोरपना विविध गावातील लाभार्थ्यांचे प्रकरणे यावेळी मंजूर करण्यात आले.


समितीमध्ये एकूण २२८ अर्ज आले होते. त्यापैकी ४५ अर्ज त्रुटी अभावी प्रलंबित ठेवण्यात आले. व १८३ अर्ज मंजूर करण्यात आले. ज्या लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांनी आपले आधार कार्ड व बँकेच्या पासबुकची एक प्रत संजय गांधी निराधार कार्यलयात लवकरात लवकर जमा करावी.
       
तालुक्यातील वृद्ध,निराधार,विधवा,अंध,अपंग,दुर्धर आजाराने ग्रस्त अश्या प्रकारच्या सर्व लाभार्थ्यांचे  प्रकरणे मंजूर करण्यात आले. तसेच समितीमध्ये संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन घेण्यात यावे, तसेच बँकच्या अधिकाऱ्यांकडून लाभार्थ्यांना जो त्रास दिला जातो व लाभार्थ्यांच्या खात्यात नियमित निधी वितरित केला जावा त्याबाबद्ल चर्चा करून ठराव पास करण्यात आला असून पुढील कार्यवाही साठी जिल्हाधिकारी यांचेकडे पाठविण्यात येणार आहे.
    
तसेच ज्या लाभार्थ्यांचे अर्ज प्रलंबित राहले असून त्यांनी सेतू केंद्रावर जाऊन त्रुटीची पूर्तता करावी असे आवाहन समिती तर्फे करण्यात आले.
   
या बैठकीला अध्यक्ष संजय मुसळे,समितीचे सदस्य आशिष ताजने,नायब तहसिलदार दडमल साहेब,पंचायत समितिचे विस्तार अधिकारी शिवनकर,निराधार योजनेचे प्रणिता मालेकर,ढोबळे सर,गजानन भोंगळे,कोरपना नगर पंचायतचे अधिकारी उपस्थित होते.