भाजपा महिला आघाडीच्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी पायल कापसे यांची नियुक्ती - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भाजपा महिला आघाडीच्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी पायल कापसे यांची नियुक्ती

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर (चिमूर-अरविंद राऊत)
      
भारतीय जनता पार्टी बद्दल  असलेल्या निष्ठेवर व त्यांच्या सक्षम कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत पायल विवेक कापसे यांची भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्ष पदी  नियुक्ती करण्यात आली आहे.
      
पायल कापसे ह्या या आधी चिमूर तालुका महिला आघाडीच्या उपाध्यक्ष पदी काम पाहत होत्या त्यांनी तालुक्यातील अनेक महिलांना भाजपा आघाडी मधे अनेक महिलांना जोडले असून भारतीय जनता पार्टीच्या महिलांच्या उपयोगी जण कल्याणकारी योजना सर्व महिलांपर्यंत पोहचवल्या त्यांचा जिल्ह्यात महिला सम्पर्क चांगला असल्याने त्यांची चंद्रपूर जिल्ह्याच्या महिला आघाडी उपाध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

दिनांक 7 फेब्रुवारी 2019 ला लिंगोबादेव देवस्थान नवेगाव पेठ येथे झालेल्या भाजपा स्नेह मिलन कार्यक्रमात खासदार अशोक नेते यांनी पायल कापसे यांच्या नियुक्तीची घोषणा केली त्यांच्या या नियुक्तीमुळे चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया, तालुका अध्यक्ष डॉ.,दिलीपजी शिवरकर,महामंत्री विनोद अढाल,राजुभाऊ देवतळे,महिला महामंत्री ज्योती ठाकरे,नगर सेविका भारती गोडे,व सर्व आघाडी अध्यक्ष व पदाधिकारी यांनी  पायल कापसे यांचे अभिनंदन केले आहे.