राजुरा येथील पत्रकाराचे घरावर दारुविक्रेत्यांचा हल्ला : खुलेआम मारामारीची आठवड्यातील दुसरी घटना: पोलीस हतबल - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा येथील पत्रकाराचे घरावर दारुविक्रेत्यांचा हल्ला : खुलेआम मारामारीची आठवड्यातील दुसरी घटना: पोलीस हतबल

Share This
 -उपविभागीय अधिकारी देशमुख यांचेकडे तक्रार 
खबरकट्टा /चंद्रपूर (विशेष प्रतिनिधी :राजुरा):
            
राजुरा शहरातील  सोमनाथपुर वार्डातील येलुकापल्ली यांच्या घरावर तेथील अवैध्य दारुविक्रेत्यांनी दगड फेकुन मारहाण केली.


गेल्या दोन दिवसापासुन राजुरा पोलीस दारुविक्रेत्यांना शोधू शकली नाही. अखेर या दारुविक्रेत्यांनी आज सायंकाळी ८ वाजता पत्रकार अंजय येलुकापल्ली यांचे घरावर हल्ला केला व त्यांच्या वडीलांना मारहाण केली. तसेच घराच्या खिडक्या व त्यांच्या घरा लगतच त्यांच्या किराणा दुकाना चे काच फोडले. राजुरा पोलीसांचे दारु विक्रेत्यांशी मधुर संबंध असल्याने राजुरा पोलीस कारवाई करीत नसल्याचा आरोप वार्डवासियांनी केला आहे. राजुरा तालुका युवा पत्रकार संघाने या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. येलुकापल्ली यांच्या घरासमोर पोलिसानी पहारा वाढवला असून आरोपींचा कसून शोध घेत आहे.
        
यामुळे राजुरा पोलीसांवर मोठे प्रश्नचिन्ह उभे झाले असुन उपविभागीय अधिकारी शेखर देशमुख यांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी सोमनाथपुर वार्डातील नागरीकांनी केली आहे.