चिचाळा(शास्त्री) येथे २५/१५ योजनेअंतर्गत सिमेंट रस्ते व गुरूदेव सेवा मंडळ सभागृह बांधकामाचे भूमिपूजन सम्पन्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चिचाळा(शास्त्री) येथे २५/१५ योजनेअंतर्गत सिमेंट रस्ते व गुरूदेव सेवा मंडळ सभागृह बांधकामाचे भूमिपूजन सम्पन्न

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (चिमूर-अरविंद राऊत)     
चिमूर तालुक्यातील भिसी आंबोली जिल्हा परिषद क्षेत्रातील चीचाळा(शास्त्री) येथील सिमेंट रस्ते व गुरूदेव सेवामंडळ बांधकाम या कामाचे भूमिपूजन सम्पन्न झाले.
    
चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी चिचाळा (शास्त्री) येथे सिमेंट रस्ते ,नाली व गुरूदेव सेवा मंडळ सभागृह बांधकाम करण्याकरिता २५/१५ योजनेमधून २० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे समस्त गावकरी लोकांनी या कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाची जय्यत तयारी केली भाजपा चिमूर तालुका अध्यक्ष डॉ.दिलीपजी शिवरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामांचे भूमिपूजन सम्पन्न सम्पन्न झाले.
        
भूमिपूजन कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांचे गावकरी लोकांनी स्वागत केले व चिचाळा(शास्त्री)  येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून मान्यवरांचे स्वागत केले.
      
या प्रसंगी चिमूर तालुका अध्यक्ष डॉ.दिलीपजी शिवरकर, तालुका महामंत्री विनोद अढाल,तालुका महिला आघाडी महामंत्री ज्योती ठाकरे,प्रफुल खोब्रागडे, राजू ठाकरे, राकेश कामडी,सरपंच जोत्सना वासनिक,जीवन रंदये, भाष्कर कुर्वे,विनायक वासनिक रंजू,दडमल,हरिदास सुखदेवें,खेमराज वानखेडे, अरविंद राऊत,सुधाकर राऊत,असुराज सुखदेवें,दिपराज रामटेके,चंद्रभान मेश्राम,रमेश सुखदेवें,व समस्त गावकरी उपस्थीत होते.
    
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन जीवन रंदये यांनी केले विविध विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्यामुळे आमदार किर्तीकुमार बंटीभाऊ भांगडीया यांचे समस्त गावकरी लोकांनी आभार मानले.