साईबाबा मंदीर संस्था राजुरा च्या अध्यक्षपदी अरुण धोटे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

साईबाबा मंदीर संस्था राजुरा च्या अध्यक्षपदी अरुण धोटे

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (दिपक शर्मा :राजुरा):

बामणी मार्गावरील वर्धा नदी परिसरातील श्री साईबाबा मंदीर संस्थेच्या नविन  कार्यकारीणीची निवड करण्यात आली आहे. या देवस्थानच्या अध्यक्षपदी राजुरा येथील नगराध्यक्ष अरुण धोटे आणि सचिव पदावर सुदर्शन दाचेवार यांची संस्थेच्या सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली.

        
राजुरा येथील रामनगर समाज मंदीरात संस्थेची सर्वसाधारण सभा झाली. या सभेत मंदीराच्या विविध विकासात्मक बाबींवर चर्चा झाली. नूतन कार्यकारीणीतील  इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे :-उपाध्यक्ष - सुनिल देशपांडे व बंडू माणूसमारे, सहसचिव - प्रकाश बेजंकीवार व पांडूरंग जरीले,  कोषाध्यक्ष - सुभाष शास्त्रकार, कायदेशीर सल्लागार - अँड.मनोज काकडे, कार्यकारी सदस्य - अशोक खंडाळे, ज्योती चिडे, रणजित धोटे, भावना रागीट, बंडू जयपूरकर, रमेश भालेराव, राजेश भोज, नारायण जयपूरकर, महेश खोके यांची निवड करण्यात आली.