रहिवासी वसाहतीच्या खुल्या जागेवर दोन गटात वाद : अखेर ती जागा चिल्ड्रेन पार्क साठी राखीव - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रहिवासी वसाहतीच्या खुल्या जागेवर दोन गटात वाद : अखेर ती जागा चिल्ड्रेन पार्क साठी राखीव

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :(राजुरा शहर प्रतिनिधी):

राजुरा शहरातील शिवाजी नगर -चुनाभट्टी वॉर्ड येथे सिद्धार्थ तेलगू विद्यालयाजवळ खुल्या जागेवर अनेक वर्षांपासून वॉर्डातील जनतेचा हनुमान मंदिर साठी जागा राखीव करण्याची मागणी होती. सदर जागेवर हनुमान मूर्तीची स्थापना ही करण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा पडीत असून नगरपरिषदेच्या संपूर्णत: दुर्लक्षित होती. गेल्या आठवड्यात काही बोद्ध बांधवानी अचानक या जागेची विहार व वाचनालायकरिता मागणी करत अतिक्रमण केले यामुळे दोन गटात टोकाचा तणाव निर्माण झाला.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दंगा नियंत्रक पथकास पोहोचले व तलसीलदार डॉ रवींद्र होळी व नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आर्शिया जुही यांनीही घटनास्थळी स्वतः हजर राहून  जागेवरून अतिक्रमनाचे साहित्य हटवून नगर परिषदेने ताब्यात घेत,  स्थापित केलेल्या हनुमान मूर्तीची रीतसर पूजा करत मूर्ती हलविण्यात आली.


घटनास्थळी शेकडो नागरिकांचा जमाव झाल्याने प्रशासनाने  कोणतीही अनुचित घटना घडण्याचे प्रसंगावधान राखून तात्काळ उपायोजना करत खुली जागा चिल्ड्रेन पार्क साठी राखीव असल्याचे जाहीर करून रीतसर बोर्ड गाडण्यात आला व लगेच झाडे उपलब्ध करून 50झाडे लावण्यात आली. 

राजुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार बाळू गायगोले यांनी परिस्थिती संपूर्णतः नियंत्रणात असून शहरात कोणताही सामाजिक वाद उद्भवू नये म्हणून खबरदारी घेत असल्याचे खबरकट्टा प्रतिनिधींना  सांगत शहरातील जनतेस शांतता प्रस्थापित करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले.