कार्यकर्त्यांमधील स्नेह संबंध हीच पक्षाची खरी ताकत :आ.बंटीभाऊ भांगडिया - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कार्यकर्त्यांमधील स्नेह संबंध हीच पक्षाची खरी ताकत :आ.बंटीभाऊ भांगडिया

Share This
-लिंगोबादेव नवेगाव पेठ येथे भाजपा स्नेह मिलन सोहळा कार्यक्रम संपन्न
-खासदार  अशोकजी नेते यांची प्रमुख उपस्थिती
खबरकट्टा /चंद्रपूर (अरविंद राऊत -चिमूर )
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे आपसी स्नेह संबंध व एकमेकांशी असलेली आपुलकीची भावना हीच पक्षाची खरी ताकत आहे असे प्रतिपादन चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी लिंगोबादेव देवस्थान नवेगाव पेठ येथील स्नेहमिलन कार्यक्रमात केले या वेळी खासदार अशोकजी नेते यांची प्रमुख उपस्थिती होती.


सदर  कार्यक्रमा प्रसंगी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन सम्पन्न झाले असून याच कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपा पक्षात पक्षप्रवेश झाला आमदार बंटीभाऊ भांगडीया व खासदार अशोकजी नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला असून त्यांनी पक्ष प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे भाजपा पक्षात स्वागत केले.

या वेळी भाजपा जेष्ठ नेते वसंतभाऊ वारजूकर, जि. प.सदस्या सौ रेखाताई कारेकर,तालुका अध्यक्ष डॉ.दिलीपजी शिवरकर,नगर सेविका भरतीताई गोडे, महिला तालुका महामंत्री ज्योती ठाकरे, महीला तालुका उपाध्यक्ष पायलताई कापसे पंचायत समिती सदस्य पुंडलिक मत्ते, पंचायत समिती सदस्य अजहर शेख प्रकाशजी वाकडे, मझरजी पटेल, बकारामजी मालोदे,राजुभाऊ देवतळे, महामंत्री विनोद अढाल, प्रफुलभाऊ खोब्रागडे, दिलीप काका कारेकर, बंडू भाऊ नाकडे, गुलाब काका फरकाडे, प्रकाश जी वाकडे,डॉ दीपक यावले, डॉ श्यामजी हंटवादे,येरचेताई, दिगंबरजी खालोरे,पंचायत समिती सदस्या नर्मदाताई रामटेके उपस्तिथीत होते.

पक्ष प्रवेश राजूभाऊ देवतळे यांच्या मुख्य नेतृत्वाखाली झाला असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेकभाऊ कापसे यांनी केले प्रास्तविक पायलताई कापसे यांनी केले.