*मासे पकडण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांपैकी विज प्रवाहाने एकाचा मृत्यू :भयभीत होउन मित्रांनी मृतदेहाला टाकला खड्यात* - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

*मासे पकडण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांपैकी विज प्रवाहाने एकाचा मृत्यू :भयभीत होउन मित्रांनी मृतदेहाला टाकला खड्यात*

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (राजुरा : विरूर स्टेशन )-
राजुरा तालुक्यातील थोमापुर येथील मृतक सोमला संज्या मालोत (वय ३८ वर्ष), बाळू बानोत, मारोती गाजूलवार हे तीन मित्र होळी सना निमित्त चिंचोली सुब्बई जंगलालगतच्या  नाल्याजवळ मासे पकडण्यासाठी गेले असता, त्या नाल्यागतच विजेचे खांब असल्याने विजेच्या ताऱाना वायर टाकून मासे पकडण्याचा प्रयत्न केला मात्र विज प्रवाह सुरु होताच सोमला मालोत याना विजेचा धक्का लागला त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.


अचानक घडलेल्या घटनेमुळे त्याचे मित्र भयभीत झाले. ही बाब गावात  माहिती होइल व आपल्याला पोलिस अटक करतील या भीतीने जवळील विहीरी सारख्या खडयात त्याला फेकून दिले व गावत परत आले.

मृत काचे नातेवाईकाना सोमला मालोत हा २२ तारखे पासुन बेपत्ता असल्याची तक्रार वीरूर पोलिस ठाण्यात दिली त्यानुसार विरुर पोलिसांनी तपासचक्र फिरवीत चौकशी केली असता २२ तारखेला मृतकाचे मित्र बाळू बानोत मारोती गाजूलवार यांच्या सोबत मासे पकडण्यासाठी गेले असल्याची माहिती मिळाली त्यानुसार बाळू बानोत याला ताब्यात घेउन पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी घडलेली घटना सांगितली.

विरुर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेउन उत्तरीय तपासणी साठी राजुरा येथे पाठविले वृत्त लिहिस्तोव बाळू बानोत हा आरोपी ताब्यात असून मारोती गाजूलवार हा आरोपी फरार आहे त्यांचेवर गुन्हा दाखल करून पुढील उपसभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार कृष्णकुमार तिवारी,मपोसे  वडतरक,प्रशांत बावने सचिन पडवे, मुंडे हे करीत आहे.