राजुरा पोलीस ठाण्यात सी सी टि व्ही सर्व्हेलन्स कक्षाचे उदघाट्न: गुन्हेगारांवर आता करडी नजर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा पोलीस ठाण्यात सी सी टि व्ही सर्व्हेलन्स कक्षाचे उदघाट्न: गुन्हेगारांवर आता करडी नजर

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

राजुरा शहर परिसरात दररोज घडणाऱ्या घडामोडी, अपघात करून पळून जाणारी वाहने,  धूम माचविणारे बाइकर्स, धार्मिक तथा सामाजिक मिरवणुका,  राजकीय मोर्चे, असामाजिक प्रवृत्ती बाळगणारे इत्यादींवर नजर ठेवता यावी यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात सर्वप्रथम राजुरा पोलीस ठाणे  येथे सी सी टी व्ही सव्हेलन्स कशाचे उदघाटन मंगळवार दि 5मार्च 2019रोजी केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते  संपन्न झाले. 

या कार्यक्रमात आमदार संजय धोटे,चंद्रपूर पोलीस अधीक्षक डॉ माहेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख, उपविभाग अधिकारी योगेश कुंभेजकार,  उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, खुशाल बोन्डे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते

भारत सरकारच्या केंद्रीय निधीतुन या उपक्रमाकरिता मदत मिळाली असून या करिता पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहीर यांना विनंती करीत सतत पाठपुरावा केला. गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांकरिता हा निधी केंद्र सरकारने मंजूर केला होता.

जिल्ह्यात प्रथमच राजुरा येथे सर्व्हेलन्स कक्ष उघडल्याने राजुरा शहर, सास्ती, लक्कडकोट या दोन गावावर पोलिसांना एका ठिकाणी बसून होणाऱ्या घटनांवर करडी नजर ठेवता येणार आहे. 
या  कक्षामुळे गुन्हेगार व समाज विघातक कार्य करणाऱ्यावर अंकुश ठेवता येईल. तसेच काही प्रमाणात पोलसांवरीलही दडपण कमी होऊ शकेल असे वक्तव्य खासदार हंसराज अहीर यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.

तर या उपक्रमाकरिता राजुरा ठाण्याची प्रथम निवड केल्याबद्दल आनंद व्यक्त करत, पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांस सौजन्याची वागणूक देण्याची गरज असल्याचे आमदार ऍड संजय धोटे यांनी व्यक्त केले

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक डॉ माहेश्वर रेड्डी, संचालन उपपोलीस निरीक्षक मुंडे तर आभार उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख यांनी मानले.

सदर कार्यक्रमास राजुरा व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष राधेश्याम अडानिया, माजी नगराध्यक्ष विलास बोनगिरवार, जिल्हा शांतता समिती सदस्य डॉ उमाकांत धोटे, जिल्हा परिषद सदस्य सुनील उरकुडे, आदिवासी नेते बाबुराव मडावी, हरिभाऊ झाडे, शिवसेना शहर प्रमुख भूमन सल्लम, पोलीस पाटील संघ जिल्हा सचिव हरिभाऊ पाहाणपटे, मस्जित कमिटीचे सय्यद सखावत अली, युवक काँग्रेस चे एजाज अहमद, महिला सुरक्षा समिती च्या सौ स्वाती देशपांडे, सौ अलका सदावर्ते, संजय निराधार योजनेच्या सदस्य सौ माणीका उपलंचीवर, ग्रामीण विभागातून आलेले पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष,सर्व नगरपरिषद सदस्य, पंचायत समिती, जिल्हा परिषद शांतता समितीचे सदस्य, पत्रकार बंधू व गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ठाणेदार बी एम गायगोले,सहायक  पोलीस निरीक्षक सुनील झुरमुरे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल झंझाळ, भारती सुंचूवार, प्रशांत चन्नावार, साईनाथ आत्राम व राजुरा पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.