केंद्रिय मानवाधिकार संघटने च्या गडचिरोली जिल्हा महीला कार्यकर्त्याकडून चपराळा देवस्थान येथे पाणी वाटप - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

केंद्रिय मानवाधिकार संघटने च्या गडचिरोली जिल्हा महीला कार्यकर्त्याकडून चपराळा देवस्थान येथे पाणी वाटप

Share This
खबरकट्टा / गडचिरोली :
पराळा धाम देवस्थान हे एक सूप्रसिध्द देवस्थान असून येथे कार्तीकस्वामी महाराजावर अतीव श्रद्धा असणारे अनेक श्रद्धाळू  येत असून येथे दरवर्षी महाशीवरात्रीला खूप मोठी यात्रा भरते. या यात्रेत लाखो भावीक भक्त येऊन कार्तीक स्वामी महाराजांचा दर्शन घेत असतात. त्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची खूप गैरसोय होत असते.


यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी केंद्रिय मानवाधिकार संघटन च्या गडचिरोली महीला कार्यकर्त्या सरसावल्या असून यत्रेत येणार्या भाविकांना ३ दिवस पाणि वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यांच्या पाणीवाटपाच्या प्रयोगाने अनेक भक्तांची त्रूष्णा त्रूप्ती झाल्याचे समाधान व्यक्त होत आहे.

पाणीवाटपाच्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता गिता कूद्रापवार, निलोफर शेख, वर्षा कलाक्षपवार, आशा मेकर्तीवार यांनी अथक परीश्रम घेतले असून यापूढे दरवर्षी चपराळा धाम आणी मार्खंडा देव येथे पाणीवाटपाचा कार्यक्रम ठेवन्यात येईल असे संघटनचे विदर्भ प्रदेश महासचिव संदिप लाटकर यांनी प्रतीनीधीशी बोलतांना सांगितले