राजूरवासीयांनी अनुभवला ठाणेदारांचा सिंघम अवतार : शहरातील मुख्य मार्गावरून धिंड काढत आरोपींना ठाण्यात केले हजर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजूरवासीयांनी अनुभवला ठाणेदारांचा सिंघम अवतार : शहरातील मुख्य मार्गावरून धिंड काढत आरोपींना ठाण्यात केले हजर

Share This
-सोमनाथपूर हल्ला प्रकरण :सात आरोपींना अटक -  चार दिवसांची पोलीस कोठडी 

खबरकट्टा / चंद्रपूर (विशेष प्रतिनिधी- राजुरा):

येथील सोमनाथपूर चौकातील युवा पत्रकार अंजय येलुकापेल्ली यांचे दुकान व घरावर हल्ला केल्याप्रकरणी बारा आरोपींपैकी सात आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलीस यशस्वी झाले असुन अद्याप पाच आरोपींच्या मागावर आहेत. दारु विक्री करुन आता गुन्हेगारीकडे वळणा-या या आरोपींना तपासासाठी गावात फिरवून पोलीसांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही परिस्थितीत गुन्हेगारांवर कडक कारवाई चे संकेत दिल्याने राजुरा उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख व ठाणेदार बाळू गायगोले यांच्या भूमिकेचे नागरीकांनी स्वागत केले आहे.

     
सोमनाथपूर येथील येलुकापेल्ली यांचे घरावर २२ मार्चला रात्री ८ वाजता सुमारे बारा दारुविक्रेत्यांनी हल्ला केला. यावेळी दगड, विटांचा मारा करुन घर , दुकान व मोटरसाइकिल ची तोडमोड केली. वार्डात शांतिप्रिय असलेल्या या कुटूंबावर हल्ला केल्याच्या घटनेने येथील वॉर्डातील नागरीकांनी संताप व्यक्त केला. 

राजुरा पोलीसांनी गेले पाच दिवसापासुन फरार असलेल्या बारा पैकी सात आरोपींना शिताफीने जेरबंद करण्यात यश मिळविले व शहरातील प्रमुख मार्गावरून त्यांची धिंड काढत पोलिस ठाण्यात हजर केले. पोलीसांना अवैध दारु व्यवसायिकाची माहिती पुरविली, या संशयातून पत्रकार अंजय व राजेंद्र येलुकापेल्ली यांचे घरावर हल्ला केला. 

या प्रकरणी सर्व बारा आरोपींवर भादंवि, अँस्टोसिटी व मुंबई पोलीस कायद्यानुसार दखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र आरोपी  पोलिसांच्या तावडीत सापडले नव्हते. पोलिस त्यांच्या मागावर होते. विसापूर येथील जंगलात त्यांना 28 मार्चला पकडण्यात आले. 

राजुरा पोलिसांनी सात आरोपींना अटक केली. आरोपी विनोद उर्फ पापा जाधव, अविनाश कोहपरे,सुरेंद्र चौधरी,  सैय्यद अशफाक, कैलाश पवार, लखन मेकलवार यांना अटक करण्यात आली. सदर आरोपी विरुद्ध भादंवि १४३,१४७,१४८,४५२,४२७,३३७,५०४,५०६, मुंबई पोलीस कायदा कलम १३५ याशिवाय अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ( अँट्रोसिटी ) कलम 3(R)(S), 3(2)(Va)यानुसार कारवाई करण्यात आली. एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याचेवर नियमानुसार कार्यवाही करण्यात आली. 

उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार बाळू गायगोले  तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राहूल जंजाळ अधिक तपास करीत आहेत. आरोपींची दोन मार्च पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.