देशी कट्टा, बंदूक आणि तालवारीसह अमलीपदार्थ जप्त: स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ची विशेष कारवाही - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

देशी कट्टा, बंदूक आणि तालवारीसह अमलीपदार्थ जप्त: स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ची विशेष कारवाही

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
काल दिनांक 4मार्च 2019 रोजी स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारावर, जुनोना रोड बाबुपेठ, विक्तूबाबा मंदिराजवळ, चंद्रपूर येथे अमली गर्द पदार्थ विक्री होत असून घरी साठवून ठेवण्यात आले आहे.
या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने छापा घातला असता घरात बसून असलेल्या तीन महिला व सोनूसिहं टाक हा पोलिसांना बघताच फरार झाला. 


पोलिसांनी सदर महिलांना ताब्यात घेऊन संपूर्ण घरची झडती घेतली असता 25.29ग्राम गर्द पावडर किंमत रु  12645/-, एक देशी कट्टा, एक बोअर रायफल, एक एअर गण रायफल, 5नग तलवार, एक भाला, 2चाकू, दोन सत्तूर, काडतुसे व इतर साहित्य सोबतच नगदी रोख 79,960 रुपये असा एकूण 1,36,205रुपये चा अवैध रित्या साठविलेला मुद्देमाल जप्त करत मोठी कारवाही केली.

सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन रामनगर येथे कलम 20 एनडीपीएस अक्ट, सहकलम 3,4,25भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास रामनगर पोलीस शाखा करीत आहे.

सदर कामगिरी डॉ श्री माहेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात परीवेक्षक पोलीस उपअधीक्षक श्री.अमोल मांडवे यांचे सह स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक मुटेकर, पोलीस उपनिरीक्षक शेख सहित दौलत चालखुरे, पद्माकर भोयर, नितीन जाधव, महेंद्र बुजाडे, गजानन निमकर, नापेका पठाण, कुंदनसिंग बावरी, विनोद जाधव, महिला पोलीस सीमा सावळे, भारती खरकाटे यांनी पार पाडली. 

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात अवैध देशी  शस्त्र साठा जप्त करून पोलिसांनी मोठी कारवाही केली त्यामुळे शहरात  अमली पदार्थ व अवैध कामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.