खबरकट्टा / चंद्रपूर (अरविंद राऊत -चिमूर):
चिमूर मतदार संघातील नागभीड तालुक्यातील घोडझरी अभयारण्यात नाईट सफारीचे उदघाटन चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे शुभ हस्ते करण्यात आले.
विकासपुरुष आमदार बंटीभाऊ भांगडीया साहेब क्षेत्राच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहून विकास कामे प्रगतीपथावर आहेत. त्यातच घोडाझरी अभयारण्यात रात्रीची सफारी सुरू करण्याचे प्रयत्नाला यश आले. पर्यटकांच्या सोयी व वन्य प्राण्यांची तळमळ बघता आज घोडाझरी अभयारण्यात रात्रीची सफारी सुरू करण्यात आली.
यावेळी डीफओ कलराज सिंग साहेब, डॉ उमाजी हिरे सर, प्रा अमीर धमानी सर, गणेशभाऊ तार्वेकर, सचिनभाऊ आकुलवार, आवेशभाऊ पठाण, वसंतभाऊ वारजूकर,संतोषभाऊ रडके, दयाराम जी कंनाके, रमेशभाऊ बोरकर, टीमु जी बलदुवा, देवा देवा बावनकर, वामन जी तुर्के, रुपेशभाऊ गायकवाड, अजयभाऊ रामटेके, हितेशभाऊ सूचक, हार्दिक सूचक, केदारभाऊ मेश्राम, सुनीलभाऊ किटे आदींसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.