राजुरा येथील आशिष आत्राम एमपीएससी उत्तीर्ण :सेक्शन आँफीसर ग्रेड बी या पदावर नियुक्ती - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा येथील आशिष आत्राम एमपीएससी उत्तीर्ण :सेक्शन आँफीसर ग्रेड बी या पदावर नियुक्ती

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससी च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत राजुरा येथील आशिष आत्राम उत्तीर्ण झाले.  त्यांची सेक्शन आँफीसर ग्रेड बी या पदावर नियुक्ती झाली आहे. 


आशिष आत्राम यांचे प्राथमिक शिक्षण जि. प .प्राथमिक शाळा, तळोधी (बा) येथे झाले तर बारावी पर्यंतचे शिक्षण नवोदय विद्यालय, तळोधी येथे झाले. त्यांनी संगणक क्षेत्रात अभियांत्रिकी पदवी रामटेक येथील केआयटीएस महाविद्यालयातून प्राप्त केली. प्राप्त केली. सध्यान ते चिमूर नगर परिषद येथे कर निर्धारण अधिकारी आहेत.
        
आशिष आत्राम हे राजुरा  येथील शिक्षक वसंत आत्राम  यांचा मुलगा असून त्यांची आई व  वडील दोघेही प्राथमिक शिक्षक आहेत,आशिष आत्राम यांनी ग्रुप बी- सेकंशन ऑफिसर पदी नियुक्ती झाली आहे याबद्दल त्यांचे शिक्षक ऋषी मेश्राम,श्रीराम मेश्राम ,डॉ.शंकर बुऱ्हाण, डॉ. सत्यपाल कातकर आणि राजुरावासियांनी त्यांचे  अभिनंदन केले आहे ,