भरधाव दुचाकी ट्रक ला धडकली:एक दुचाकी स्वार जागीच ठार दुसरा गंभीर जखमी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भरधाव दुचाकी ट्रक ला धडकली:एक दुचाकी स्वार जागीच ठार दुसरा गंभीर जखमी

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर:
भरधाव दुचाकी घेऊन जात असताना चंद्रपूर नागपूर मार्गावरील टोल नाक्याजवळ  लखमापूर येथे ट्रक ला दुचाकीने धडक दिली, धडकेत दोन्ही विद्यार्थी गंभीर जखमी झाले.


लखमापूर जवळ ट्रक पलटत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव MH 34 AN 9048 क्रमांकाची दुचाकी येत होती,भरधाव  दुचाकीवरचे नियंत्रण सुटताच  दुचाकी ट्रकला धडक देत आत घुसली, दुचाकीवर प्रणय रेड्डी व हे विद्यार्थी12विचा पेपर द्यायला निघाले होते. फैयाज शेख यांचा घटनास्थळीच मुर्त्यू झाला असून दुसरा विद्यार्थी प्रणय रेड्डी  गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालय चंद्रपूरमध्ये हलविण्यात आले.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मुख्य मार्गावर स्पीड ब्रेकरची मागणी केली. रस्ता सुरक्षा सप्ताहात सुद्धा विद्यार्थी असे बेधुंद होऊन दुचाकी चालवीत असतात, वाहतूक पोलीस अजूनही अश्याया दुचाकीवर कारवाई करण्यात मागे आहे.