आमदार धानोरकरांच्या काँग्रेस प्रवेश हालचालींना वेग :तातडीने बैठक बोलावून जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आमदार धानोरकरांच्या काँग्रेस प्रवेश हालचालींना वेग :तातडीने बैठक बोलावून जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न

Share This
-आज सायंकाळी विजय वडेट्टीवार व सुभाष धोटे सहित होणार दिल्ली रवाना 
खबरकट्टा /चंद्रपूर (वरोरा प्रतिनिधी):

  
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना भाजप युती झाल्यापासून शिव सेनेच्या अंतर्गत गोटात असंतोष मोठ्या प्रमाणात खदखदत असताना संभाजी महाराजाचे प्रमुख भूमिका साकारणारे डॉ.अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर शिवसेनेचे अनेक खासदार आमदारांचे दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचे सत्र सुरु आहे.


यात आणखीच भर वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार बाळू धानोरकर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेला जिल्हाभरात उधाण आले असताना वरोरा येथे शिवसेनेच्या जिल्ह्यातील सर्व फळीतील कार्यकर्त्यांची त्यांनी बोलावलेली तातडीची बैठक पूर्ण विराम लावण्याच्या तयारीत आहे .या बैठकीला संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास 150कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत धानोरकर यांनी काँग्रेस  पक्ष प्रवेशाबद्दल स्पष्ट उल्लेख केला नसला तारीही त्यांच्या बोलण्याचा ओघ लोकसभा व नवीन समीकरणाबाबत होता. त्यामुळे अनेक निष्ठावान कार्यकर्ते बैठकीतून बाहेर पडताना संभ्रमात होते.    

शिवाय पूर्व विदर्भात शिवसेनेचे एकमेव आमदार बाळू धानोरकर ते अगोदरच भाजपा सोबतच्या युती विरोधांत आपली प्रखर भूमिका मांडत होते .कारण पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अगोदरच शिवसेना महाराष्ट्रात स्वबळावर लढेल तुम्ही तयारीला लागा असे आव्हान केले होते व चंद्रपूर वणी आणि लोकसभा क्षेत्रात शिवसेनेच्या बाळू धानोरकर यांना पक्षाची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली होती आमदार बाळू धानोरकर हे लोक सभा निवडनुकीच्या तयारीला लागले होते पण शिवसेना पक्ष प्रमुखानी पुन्हा भाजप सोबत युती केल्याने आमदार बाळू धानोरकर यांनी आपण भाजपा सोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. 

आणि कांग्रेस मध्ये ते प्रवेश करणार अशा चर्चा असतांनाच आता स्वतः आमदार बाळू धानोरकर यांनी आपले कांग्रेस प्रवेशाचे सुतवाच  केल्याने आता पूर्व विदर्भातील एकमेव शिवसेनेच्या ढाण्यावाघ कांग्रेस मध्ये जाणार हे निश्चित झाले आहे.

1मार्च 2019ला दिल्ली येथे काँग्रेस पक्ष प्रमुख राहुल गांधी यांची घेतलेली गुप्त भेट सर्वत्र चर्चेत आल्यावर आजच्या वरोरा बैठकीला मोठे वलय आले होते.बैठकीनंतर लागोलागच आज दिनांक 3मार्च ला सायंकाळी धानोकर काँग्रेस उपगट नेते आमदार विजय वडेट्टीवार व जिल्हा अध्यक्ष सुभाष धोटे यांच्या सोबत दिल्ली रवाना होऊन उद्या पर्यंत पक्ष प्रवेशाची घोषणा करणार निश्चित मानले जात आहे.