सावकारी कर्जापायी शेतक-याची आत्महत्या - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सावकारी कर्जापायी शेतक-याची आत्महत्या

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर(राजुरा प्रतिनिधी ):

राजुरा तालुक्यातील साखरवाही या गावातील अल्पभुधारक तरुण शेतकरी मनोज विठ्ठल रासेकर ,वय ३२ या युवकाने सावकाराच्या कर्जाला कंटाळून शेतात झाडाला फास्फेट लावून आत्महत्या केली.

       
 मनोज रासेकर रात्री शेतावर जागलीसाठी गेला होता. आज सकाळी त्याने शेतातील झाडाला दोर बाधून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्याचे कडे दोन एकर धानाची शेती असुन पिक न झाल्याने तो चिंतेत होता. त्याचेवर खाजगी सावकारांचे कर्ज होते. ते कसे फेडायचे या विवंचनेत आज अखेर गळफास घेऊन मनोज रासेकरने आत्महत्या केली.
       
प्रेताची उत्तरीय तपासणी करण्यात येऊन सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचेमागे एक पाच वर्षाचा मुलगा,तिन वर्षाची मुलगी, पत्नी व वयोवृद्ध आईवडील आहेत. या तरुण शेतक-याच्या अकाली जाण्याने गावात शोककळा पसरली आहे.