पुरोगामी शिक्षक समितीच्या नेतृत्वात प्राथमिक शिक्षकांचे विविध मागण्यांकरिता जिल्हा परिषदेसमोर धरणे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पुरोगामी शिक्षक समितीच्या नेतृत्वात प्राथमिक शिक्षकांचे विविध मागण्यांकरिता जिल्हा परिषदेसमोर धरणे

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्याविविध समस्या प्रलंबित आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करुन निवेदने देण्यात आली. मात्र, त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. परिणामी समस्या सुटण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे पुरोगामी शिक्षक समितीच्या नेतृत्वात शनिवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले.

वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर यादी तत्काळ प्रकाशित करुन वेतन निश्चित करावे, सदोष समायोजन तात्काळ करावे, पदोन्नतीने भरावयाची विस्तार अधिकारी रिक्त पदे तत्काळ भरावी, सहाव्या वेतन आयोगाचे पाच ही हप्ते खात्यात जमा करण्यासबंधी शिबिराचे आयोजन करावे, जिल्ह्यातील कार्यरत सर्व शिक्षकांचे सेवा पुस्तक अद्ययावत करुन पडताळणी करण्यासंबंधी शिबिराचे आयोजन करावे, पदवीधर, उच्चश्रेणी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांची वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी मंजूर करावी, प्राथमिक शिक्षकांची निवड श्रेणी यादी प्रकाशित करुन आतापर्यंत किती शिक्षकांना निवड श्रेणी दिली गेली आणि पुढील निवड श्रेणी प्रतीक्षा यादी प्रकाशित करावी, शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयीकृत स्टेट बँकेत करावे, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शिष्टमंडळातर्फे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.