चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेनेत मोठे फेरबदल :संदीप गिऱ्हे व नितीन मत्त्ते नवे जिल्हाध्यक्ष - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेनेत मोठे फेरबदल :संदीप गिऱ्हे व नितीन मत्त्ते नवे जिल्हाध्यक्ष

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर 
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून शिवसेनेत सुरू असलेल्या घडामोडींना अखेर विराम मिळाला. आमदार धानोरकर यांच्या राजीनाम्याने शिवसेनेला खिंडार पडण्याची वेळ आली होती.जिल्ह्यातील सेनेची फळी आता बदलण्याचा मार्गावर आलेली आहे. 

    
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीने नव्या जिल्हाप्रमुखाची नियुक्ती करत , 22 मार्चला चंद्रपूर गडचिरोली संपर्कप्रमुख सुरेश सावंत यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांची बैठक घेत युतीच्या उमेदवाराला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
  
सुरेश सावंत यांनी यावेळी सांगितले की जिल्हाप्रमुख बदलला की कार्यकारणी पण बदलणारच, सध्या निवडणुकीच वातावरण असल्याने कोणत्याही प्रकारचे बदल करणार नाही, नवे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व नितीन मत्ते यांच्या मागे जिल्ह्यातील युवक पाठीशी आहे, जिल्ह्यात निष्ठावंत व युवकांच काम शिवसेनेला भविष्यात समोर नेणार.