तिसरी आघाडी ठरविणार जय-पराजयाचे खरे गणित : वाचा नेमका काय आहे तिसरा पर्याय - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

तिसरी आघाडी ठरविणार जय-पराजयाचे खरे गणित : वाचा नेमका काय आहे तिसरा पर्याय

Share This
खबरकट्टा / राजकीय  (विश्लेषण)-
(चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा विशेष :भाग -2) 


चंद्रपूर-वणी-आर्णी मतदार संघांचे भाजपा पक्षाचे हंसराज अहीर मागच्या 20 वर्षापासून संसद सदस्य आहेत.2014 मध्ये त्यांना 508000 मत मिळाली,कांग्रेस चे देवतळे यांना 271000 मत मिळाली,अपक्ष(आप प्रणित) वामनराव चटप यांना 204400 मत मिळाली,हंसराज कुंभारे बसपा यांना 49000 मत मिळाली,उर्वरित उमेदवारांना नगण्य  मते मिळाली.

यावेळी हंसराज अहीर पराभूत व्हायला हवेत अशी जिल्ह्यातील लोकांची मानसिकता आहे,तरीही कांग्रेस जिंकली पाहिजे अस कोनालाच वाटत नाही. जिल्ह्यातील लोक या दोन्ही पक्षपासून दूर होण्यास उत्सुक आहेत, आणि म्हणून मागच्या काही निवडणुकीत तीसरा पर्याय म्हणून कधी  वामनराव चटप किंवा बसपा अशी भूमिका लोक घेताना दिसत होते.

नामांकन वैध झालेल्या 17  उमेदवारांपैकी काही पक्ष किंवा अपक्ष असे इतर 15 उम्मीदवार आहेत ज्याना 10000 च्या आत मते  पडलित असे एकंदरीत  75000 मतांचे  विभागित गणित ध्यानात घेऊन सर्वच मुख्य उमेदवार कामाला लागले आहेत.

मागच्या  2014 निवडणुकीत विद्यमान अहीर यांना 508000 मत मिळाली आणि ते फार मताच्या अंतराने निवडून आले,परंतु यावेळी 300000 मत घेतली तरी बरे असे दबक्या आवाजात राजकीय विश्लेषक बोलत असले तरीही पर्यायी समीकरण लक्षात घेतले पाहिजे.

जर असे वातावरण असेल तर तीसरा पर्याय कोण ज्यात इतकी मजल मारण्याची शक्यता असेल.  .???

लढत बीजेपी कांग्रेस अशी असली तरीही चंद्रपुरकर तीसरा पर्याय शोधत आहे हे मात्र तितकेच खरे .मागील दोन निवडणुकांत तीसरा पर्याय म्हणून उपलब्ध असलेले वामनराव चटप यावेळी रिंगनात नाहीत,बसपा थंड बस्त्यात आहे.

तर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी चे उमेदवार दशरथ मड़ावी होऊ  शकतात.परंतु हे कसे शक्य आहे अनेकांना प्रश्नचिह्न आहे. 

चंद्रपुर जिल्ह्यात मागच्या 3 वर्षापासून बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी राजु झोड़े यांनी धुमाकुळ घातला आहे.प्रत्यक्ष चित्र बघता त्यांचा जनसंपर्क ही वाढला आहे .विदर्भ वादी वामनराव चटप दशरथ मड़ावी यांना पूर्णपणे मदत करीत आहेत असे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी  गणित आहे. सोबतच दशरथ मड़ावी हे आदिवासी समाजतिल उमेदवार असल्याने येथील आदिवासी समाजाला कोणीच उमेदवारी किंवा भागीदारी न दिल्याने  हा नेतृत्व हिन् समाज पहिल्यांदा मिळालेल्या उमेदवारीला चांगलाच प्रतिसाद देतील अशी अपेक्षा ते बाळगून आहेत.

शिवाय  दशरथ मड़ावी हे यवतमाळ जिल्ह्यातील असल्याने वणी, आर्णी ,घाटंजी,मारेगाव, पांढरकवड़ा या क्षेत्रात मताची लीड घेण्याची शक्यता जास्त आहे.

राजुरा,कोरपना,गदचंदुर,जीवती,गोंडपिपरी,मूल,सावली, बल्लारपुर,भद्रावती,ऊर्जानगर येथे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा जनसंपर्क मजबूत आहे.या पलीकडे आम आदमी पार्टी,विदर्भ निर्माण मंच यांचे मतदारही सोबत येतील.

हे सर्व लक्षात आल्यानंतर एक फ्लोटिंग वोट आणि बौद्ध व् मुस्लिम समाजातील काही मतदार इकडे आकर्षित होण्याची संभावना निर्माण होईल.त्यांच् सोबत बसपा मधील सुशिक्षित कैडर मतदार दशरथ मड़ावी यांना मिळेल याबाबत शंका नको.नाराज असलेले बीजेपी आणि कांग्रेस मधील कार्यकर्ते आणि सामाजिक चळवळ चालविनारे कार्यकर्ते तीसरी मोठी शक्ति दशरथ मड़ावी साहेब यांना वोटिंग करण्यास प्रवृत्त करुण आपली असमर्थता दर्शविल तर काही वावगे वाटू नये.

सोबतच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेन्द्र महाडोळे हे सर्वात जास्त शिकलेले उमेदवार म्हणून चर्चित आहे. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यासाठी सभा घेतल्यास मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या मतांची विभागणी होऊ शकते. 


यावेळी सक्षम तीसरा पर्याय दिसून येत नसला तरी वंचित बहुजन आघाडी व विदर्भ निर्माण महामंच हे एकत्रित जवळपास लाखाच्या घरात मताधिक्य मिळवू शकतात. हे मतदान मुख्यत्वे अनुसूचित जाती  व जमाती चे असल्याने काँग्रेसचा मुळ मतदार यावेळी मोठ्या प्रमाणात विभाजित होणार आहे. तर याचा फायदा हा भाजपा उचलू शकेल. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीने वातावरण ढवळले आहे. लढत दुहेरी असली तरी महाडोळे, मडावी यांची मते निर्णायक ठरणार आहेत.

ज्याना बदल करायचा आहे,बदल हवा आहे,यावेळी परंपरागत एवढ्या वर्षापासून चालत आलेल्या कांग्रेस बीजेपी ला धक्का देवून आपल्या माणसाला निवडून आणू शकतात,त्यामुळे वेगळ्या विदर्भाच्या अन्दोलनाला नक्कीच गति मिळेल,आणि वेगळा विदर्भ झाल्यास सर्वात अगोदर इथली बेरोजगारी कमी होईल.शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविन्यास मदत होईल.मतदाता बदल घडवू शकतो.


लेखक :सदन कांबळे
                  रा. घुगूस,ता-जि-चंद्रपुर
बहुजन चळवळी करीता 25 वर्षापासून चर्चा,विचारमंथन.
SC, ST, ओबीसी व् माइनॉरिटीज  करीता संघर्षरत.