चार कृषी महाविद्यालयांच्या पद निर्मितीचा प्रस्ताव एकत्रित सादर करा -सुधीर मुनगंटीवार : चंद्रपूर जिल्ह्यातील मूलचाही समावेश - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चार कृषी महाविद्यालयांच्या पद निर्मितीचा प्रस्ताव एकत्रित सादर करा -सुधीर मुनगंटीवार : चंद्रपूर जिल्ह्यातील मूलचाही समावेश

Share This
खबरकट्टा / मुंबई -(चंद्रपूर):

यवतमाळ, पेठ, मूल आणि हळगाव या चार कृषी महाविद्याल्यातील  पद निर्मितीचा प्रस्ताव  कृषी विभागाने एकत्रितरीत्या तयार करून तो वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करावा अशा सूचनाअर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

आज अर्थ मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत वित्तविभागाचे  सचिव  राजगोपाल देवरा  यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रस्ताव आल्यानंतर वित्त विभागाने त्यास तत्काळ मान्यता द्यावी असे निर्देश देऊन श्री. मुनगंटीवार म्हणाले की, आई सी आर  निकषानुसार वरील चार ही महाविद्यालयांची पदे तत्काळभरण्यात यावीत आणि सहा महिन्यांच्या आत या महाविद्यालयात आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात.

शासनाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत  यवतमाळ येथे शासकीय अन्न तंत्रज्ञान  महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे त्याप्रमाणे याच विद्यापीठांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास ही मान्यता देण्यात आली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत हळगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरशासकीय कृषी विद्यालय आणि पेठ , जिल्हा सांगली येथे अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय  स्थापन करण्यास देखील  शासनाने मान्यता दिली आहे.