काँग्रेसच्याचं नेत्यांमुळे बाळू भाऊ धानोरकर यांचा पराभव होणार का..? - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

काँग्रेसच्याचं नेत्यांमुळे बाळू भाऊ धानोरकर यांचा पराभव होणार का..?

Share This
खबरकट्टा / राजकीय  (विश्लेषण)-
(चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा विशेष :भाग -1) 

अनेक नाट्यमयी घटना घडल्यानंतर चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राची उमेदवारी बाळू भाऊ धानोरकर यांना मिळाली. तत्पूर्वी  काँग्रेसने विनायक बांगडे यांची उमेदवारी जाहीर केली होती.

ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पत्रकारांसमोर येऊन काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया व नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी  विनायक बांगडे यांना समर्थन दर्शविले होते. 

परंतु  आमदार विजय वडेट्टीवार हे मात्र विनायक बागडे यांच्या उमेदवारीच्या समर्थनार्थ समोर आले नाही. याउलट बाळू धानोरकर यांना सोबत घेऊन ते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांनी दिल्ली गाठली. 

विनायक बांगडे यांची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर बाळुभाऊ धानोरकर यांच्या उमेदवारीची मागणी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे हे दिल्लीला का गेले नाहीत..? व विनायक बांगडे यांच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद त्यांनी का घेतली..? या प्रश्नांच्या उत्तरात बरेच काही दडले आहे. 

जनतेत चर्चा आहे की, बाळू भाऊ धानोरकर निवडून आल्यास एका विशिष्ट समाजाचा दबदबा निर्माण होईल व आपल्या नेतृत्वास मर्यादा तयार  होईल ही भीती नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना होती काय ?

मागील निवडणुकीचा इतिहास बघितल्यास राजुरा विधानसभा क्षेत्रातून भाजपाचे प्रभावी कैडर नसताना लोकसभेला  हंसराज अहिर यांना जवळजवळ 64 हजाराचे  मताधिक्य मिळाले होते आणि जवळपास तितकेच 64 हजार मतदान सुभाष धोटे यांना विधानसभेला मिळाले. हा काही योगायोग नव्हता , असे राजकीय तज्ञ सांगतात.

काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष व भाजपाचे विद्यमान खासदार हंसराज अहिर यांची छुपी सलगी राजकीय विश्लेषकांकरिता नेहमीच ऊत्सुकतेचा  विषय राहिला आहे .हे अंतर्गत साटेलोटे बाळू भाऊ धानोरकर यांना महागात पडू शकते. 

बाळू भाऊ धानोरकर निवडून आल्यास वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राची जागा हे बाळू भाऊच्या मर्जीतील व्यक्तीला जाणार हे निश्चित आहे.त्यामुळेच देवतळे परिवार देखील बाळुभाऊ धानोरकर यांच्या उमेदवारीने दुखावलेला असल्याची अधिकृत सूत्रांची माहिती आहे. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे व देवतळे परिवार हे एकमेकांचे नातेवाईक असल्याने बाळू भाऊ धानोरकर यांची उमेदवारी या नेत्यांच्या राजकीय भवितव्यासाठी पचनी पडलेली दिसत नाही. 

त्यामुळेच  प्रचारात एकमेकांचे हात घालून चालणारे हे नेते कुरघोडीच्या राजकारणातून बाळू धानोरकर यांचा पराभव तर करणार नाही ना..? अशी भीती सामान्य जनतेत निर्माण झाली आहे.

तसेही,  या लोकसभा क्षेत्राचा  इतिहास बघितल्यास संपूर्ण काँग्रेस एकत्रित येऊन आपल्या उमेदवाराचा कधीच प्रचार करत नाही. याउलट काँग्रेसचेच काही नेते आपल्या पक्षातील उमेदवाराला पाडण्यास मदत करतात. त्यामुळे पक्षातील हे अंतर्गत राजकारण थोपविण्याचे मोठे आव्हान आता काँग्रेससमोर आहे. त्यामुळे मतदारांपुढेही आपले मतदान सत्कर्मी लावण्याचे आव्हान ठाकले आहे .