बाळू धानोरकर यांना काँग्रेस ची उमेदवारी निश्चित :आज सायंकाळी अधिकृत घोषणा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बाळू धानोरकर यांना काँग्रेस ची उमेदवारी निश्चित :आज सायंकाळी अधिकृत घोषणा

Share This

-राहुल गांधी यांच्याकडे धानोरकरांची फाईल सादर थोड्याच वेळात अधिकृत घोषणा
खबरकट्टा / राजकीय :

अखेर अनेक नाट्यमय घडामोडीनंतर चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघातून विनायक बांगडे यांची उमेदवारी मागे घेत बाळू धानोरकर यांना उमेदवारी निश्चिच झाल्याचे खात्रीलायक वृत्त येत आहे. 


ऑल इंडिया काँग्रेस कमिटी च्या 22मार्च च्या यादीत चंद्रपूर लोकसभा मतदार संघाकरिता काँग्रेस चे माजी जिल्हा अध्यक्ष  विनायक बांगडे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र काँग्रेस चे राजकीय वातवरण ढवळून निघाले होते. 

त्यातल्या त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक युवा कार्यकर्त्यांनी याचा सर्व माध्यमांतून निषेधकरत जाहीर नाराजी व्यक्त केला होती. त्याहीपुढे धानोरकरांकरिता उमेदवारीची मागणी करणारे काँग्रेस जिल्हा अध्यक्ष , उपगटनेते ते थेट प्रदेश अध्यक्ष यांना फोन करून विनवणी करण्याची ऑडिओ क्लिप वायरल झाल्यानंतर सर्व प्रसारमाध्यमात वादळ सुरु होऊन प्रदेश अध्यक्ष नाराजगीत असून राजीनामा देण्याच्या तयारीत आहे असे युवा ते सोसिअल मीडिया मधे ट्रोल करण्यात येत होते. 

या सर्वांची परिणीती अखेर बांगडे यांना समजावून बाळू धानोरकर यांनाच उमेदवारी जाहीर करण्यात होऊन उद्या अर्ज दखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नामांकन सादर करण्यात होईल याची सर्व कार्यकर्त्यांना ग्वाही देण्यात आली आहे.