अवैध जड वाहतूक प्रकरणी तीन हायवा ताब्यात : तहसीलदार राजुरा यांची धडक कारवाही: *राजकीय नेत्याच्या अवैध वाहतुकीला चोप बसणार काय??? *-लक्षवेधी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अवैध जड वाहतूक प्रकरणी तीन हायवा ताब्यात : तहसीलदार राजुरा यांची धडक कारवाही: *राजकीय नेत्याच्या अवैध वाहतुकीला चोप बसणार काय??? *-लक्षवेधी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (राजुरा- लक्षवेधी):

काल रात्री (दिनांक 23मार्च 2019शनिवार) राजुरा महसूल हद्दीत, गोंडपिपरी तहसील येथील हिवरा रेती घाटावरून अवैध जड वाहतूक करीत येणाऱ्या तीन वाहन  (दहा चाकी हायवा ट्रक) तहसीलदार यांनी ताब्यात घेतले  असून, या प्रकारच्या घटना सतत घडत असूनही अवैध जड वाहतूकदारांवर चोप का बसत नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.पुढील कारवाहीवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

सविस्तर वृत्त या प्रमाणे की काल रात्री राजुरा महसूल विभागाला मिळालेल्या  गुप्त माहिती नुसार, तहसीलदारांनी राजुरा हद्दीत अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन क्र. MH34 M 8387, MH 34 BG8386 व  MH34 BG3312  या अवैध जड वाहतूक (3ब्रास पेक्षा जास्त) दहा चाकी हायवा ट्रक ताब्यात घेतल्या आहेत.


13मार्च 2019 पासून गोंडपिपरी तालुक्यातील हिवरा येथे शासकीय रेती घाट लिलावांती सुरु करण्यात आला असून,सदर उपसा करणाऱ्या कंत्राटदाराला 1600ब्रास रेतीची उचल करण्याची परवानगी असल्याचे समजते.त्यास ट्रक वाहतूकदारास प्रति 3ब्रास उपसा रेती भरून देण्याची मान्यता असून तेवढीच वाहतूक रॉयल्टी देण्याची परवानगी आहे.तरीही  वजनाचे कोणतेही यंत्र उपलब्ध नाही. 

याचाच फायदा घेत 3ब्रास च्या वर रेती ची उचल होत असून 5 ते 6 ब्रास रेती भरून गोंडपिपरी-राजुरा-कोरपना ते थेट  जिवती या चार महसूल क्षेत्रातून खुले आम वाहतूक केली जात आहे. असे यापूर्वीही अनेकदा उघड होऊनही या वर लगाम का लागत नाही प्रश्नचिन्ह आहे.
आम्हाला मिळालेल्या गुप्त माहिती नुसार अवैध जड वाहतूक करणारे तीन  वाहन ताब्यात घेऊन तहसील शिवारात ठेवलेले आहे. कार्यालयीन दिवशी वाहन मालकांची परिवहन विभागाकडून अधिकृत ओळख पटवून पुढील कारवाही करू - तसीलदार राजुरा(दूरध्वनीक संभाषणात)

🔷गणित राजकीय आशीर्वादाचे:
या प्रकारे वाहतूक करणाऱ्यांत तीन पैकी जिवती येथील एका रुढावलेल्या राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप असून  त्यांच्या पाठीवर राजुरा व चंद्रपूर येथून आशीर्वाद असल्याचे दबल्या आवाजात बोलल्या जाते. त्यामुळे वाहतूकदार दोषी आढळ्यास नक्की कारवाही होईलच शंका आहे.

🔷कायदा काय सांगतो :
महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन यांचे निर्णय क्रमांक गोखनी 10/0615/ प्र.क्र  289/ ख.  दिनांक 3/1/2018 वाळू / रेती निर्गती सुधारित धोरण मधील परिच्छेद क्र.13 व अटी शर्ती बाबतचे विवरण पत्र मधील अट क्रमांक 6 मधील निर्देशाप्रमाणे वाहतूक परवाना वहन क्षमतेपेक्षा अधिक रेती खनिजाची वाहतूक करीत असल्यास संपूर्ण रेती अवैध ठरवून त्यावर दंडात्मक कारवाही करण्याची स्पष्ट तरतूद आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48(8) च्या तरतुदी नुसार यात दोषी आढळ्यास प्रति वाहन 2लक्ष रुपये पर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद आहे.