राजुरा शहरात भरदिवसा गुंडगिरी प्रकरण :अखेर दोन्ही बाजूंवर गुन्हा दाखल :पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा शहरात भरदिवसा गुंडगिरी प्रकरण :अखेर दोन्ही बाजूंवर गुन्हा दाखल :पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (राजुरा विशेष प्रतिनिधी) :
             
राजुरा येथील भारत चौकात शिंपी व्यवसायी गुलाब लोडल्लीवार याचे घरात घुसून त्याला मारहाण करणा-या काही आरोपींविरुध्द राजुरा पोलीसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. याच घटनेतील हल्ला करणा-या कुटूंबातील महिलेने केलेल्या तक्रारीनुसार लोडेल्लीवार व त्याला वाचविण्यास आलेल्या शेजा-याविरुध्द ही गुन्हा नोंदविण्यात आला  आहे. 
              
दिनांक १८ मार्चला दुपारी बारा ते पंधरा महिला व पुरुषांनी पत्नीला ढकलून  देऊन गुलाब लोडेल्लीवार याला खाली पाडून बेदम मारहाण केली आणि त्याचे घरून पिशव्यांमधे सामान भरुन बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला. परंतू यावेळी वार्डातील नागरीक धावून आल्याने हे हल्लेखोर पळून गेले. राजुरा पोलीसांनी गजानन गुलाब लोडेल्लीवार याने दिलेल्या तक्रारीवर आरोपी गोपाल येन्नावार, सतिश येन्नावार व त्यांचे चंद्रपूर व राजुरा येथील  तिन जावई यांचेविरुध्द राजुरा पोलीसांनी अपराध क्रमांक १३७।१९ अन्वये भादंवि च्या ४५२, ४२७, ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा नोंदविला आहे. विरोधी बाजूकडील सौ.सुवर्णा बिजगीरवार या महिलेच्या तक्रारीवरुन गुलाब लोडेल्लीवार व त्यांचे शेजारी सुभाष रामगीरवार यांचेविरुध्द भादंविच्या कलम ३२५ व ३४  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
           
भारत चौकात कमलाबाई लोडल्लीवार या महिलेचे घरावर बेकायदेशीर कब्जा करण्याचा प्रयत्न करणा-या बाहेरच्या लोकांना येथील वार्डातील नागरीकांनी एकजुटीने हाकलून लावले. यावेळी झालेल्या झटापटीत गुलाब लोडेल्लीवार यांच्या एका नातेवाईकाला हद्यरोगाचा धक्का बसल्याने त्याला तातडीने चंद्रपूर येथे भरती करण्यात आले. नंतर त्याचेवर शस्रक्रिया करण्यात आली. यावेळी घरावर चालून आलेल्या सौ.सुवर्णा बिजगिरवार हिला धक्का लागल्याने ती खाली पडली. परंतू तिने आपल्याला मारहाण केल्याची तक्रार पोलीसांत केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी ठाणेदार बाळू गायगोले अधिक तपास करीत आहेत.
         
गुंडगिरी करुन गैरकायदेशीरपणे घरावर ताबा मिळविण्याचा या प्रकाराची तालुक्यात सर्वत्र चर्चा असुन यामुळे येथे दहशत निर्माण झाली आहे. पोलीसांनी निष्पक्षपणे कारवाई करावी, अशी मागणी भारत चौक वार्डातील नागरीकांनी केली आहे.