युवकांनी गीत गायनातून स्फूर्ती आणि प्रेरणा घ्यावी : शेखर देशमुख - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

युवकांनी गीत गायनातून स्फूर्ती आणि प्रेरणा घ्यावी : शेखर देशमुख

Share This
-रामपूर येथे देशभक्ती व भावगीत स्पर्धा :56 स्पर्धक सहभागी

खबरकट्टा /चंद्रपूर (शोएब शेख -राजुरा)

समाज कार्य करण्यासाठी देशाला तरुणांची मोठ्या प्रमाणात गरज आहे देशाच्या संरक्षणासाठी व लोककल्याणकारी कार्यासाठी युवकांच्या मनगटात शक्ती हवी आहे त्यासाठी देशभक्ती व भावगीत यांच्या माध्यमातून युवकांना स्फूर्ती आणि प्रेरणा मिळत असते त्याकरिता थोर पुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करीत असताना डीजेच्या तालावर थरकण्यापेक्षा रक्तदान शिबिर, देशभक्ती, भावगीत गीत गायन स्पर्धेचे आयोजन केल्यास हि खऱ्या अर्थाने थोर पुरुषांना श्रद्धांजली वाहली जाणार असल्याचे मत उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख यांनी रामपूर ग्रामविकास उद्देशिया संस्था रामपूर च्या वतीने आयोजित देशभक्तीपर गीत गायन व भावगीत गीत गायन स्पर्धेच्या  उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना संबोधित केले.
       
रामपूर ग्रामविकास बहुद्देशीय संस्था रामपूर च्या वतीने रक्तदान शिबिर आणि देशभक्तीपर भावगीत गीत गायन स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत जिल्ह्यातील विविध ठिकाणावरून पंधरा वर्षे वयोगटातील खालील व खुल्या गटामधून एकूण 56 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
          
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर ओमप्रसाद रामावत संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती राजुरा, उद्घाटक शेखर देशमुख उपविभागीय पोलीस अधिकारी राजूरा, प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संभाजी वारकड प्राचार्य शिवाजी महाविद्यालय राजुरा, अविनाश जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य, नामदेव गौरकार, प्रा. सुयोग साळवे, वंदनाताई गौरकार सरपंच रामपूर, हेमलताताई ताकसांडे उपसरपंच, साजिद बियाबानी, बादल बेले, प्रकाश उरकुंडे, ग्रामपंचायत सदस्य विलास कोदीरपाल, जगदीश बुटले, रमेश झाडे, सिंधुताई लोहे, सुनिता उरकुडे, अनिता आडे, संगीता विधाते, ग्राम विकास अधिकारी अमरदीप खोडके यांची उपस्थिती होती.
            
देशभक्तीपर व भावगीत स्पर्धा दोन गटात घेण्यात आली  दोन्ही गटातील विजेत्या मयुरी प्रभाकर जुनघरी ठरल्या आहे, स्पर्ध्येला जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून स्पर्धक सहभागी झाले होते. परीक्षक म्हणून मोहनदास मेश्राम, वासुदेव आत्राम यांनी काम पाहिले.
      
स्पर्धा झाल्यानंतर लगेच बक्षीस वितरण रमेश गौरकार, वामन खंडाळे, तातोबा हिंगाणे, शंकर लांडे, रामचंद्र बोबडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण गोरे, जयश्री रोगे, सुयोग साळवे यांनी केले तर आभार सुनील गौरकार यांनी मानले, यावेळी कपिल इटनकार, अक्षय कायळींगे, हर्षल गौरकार यांनी सहकार्य केले.