ट्रम्प यांचा भारताला मोठा झटका; 'जीएसपी' दर्जा काढला - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ट्रम्प यांचा भारताला मोठा झटका; 'जीएसपी' दर्जा काढला

Share This
खबरकट्टा /आंतरराष्ट्रीय बातमी :

वॉश्गिंटन- अमेरिकेने भारत आणि तुर्कस्तानशी असलेली व्यापार संधी (जीएसपी) तोडली असून विशेष व्यापारी सूट देण्याचा दर्जा काढून घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सिनेटमध्ये ही माहिती दिली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा मोठा परिणाम भारताला जाणवणार असून अधिसूचना जारी झाल्यानंतर दोन महिन्यांनी हा बदल लागू होईल. 

भारत हा अमेरिकी उत्पादनांवर अधिक आयात शुल्क आकारणारा देश आहे, असे मत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले होते. किमान कर अथवा बरोबरीचा कर असावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ट्रम्प म्हणाले की, भारत आमच्या देशावर अधिक शुल्क आकारतो. यावेळी ट्रम्प यांनी यावेळी भारतासारख्या देशांशी असलेल्या जागतिक आणि व्दिपक्षीय संबंधांसह विविध मुद्यांवर भाष्य केले. भारत समसमान कर आकारेल याबाबत शाश्वती नसल्याने भारताचा हा दर्जा काढून घेतल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

दरम्यान, जीएसपी अंतर्गत अमेरिकेमध्ये भारताला करासंदर्भात विशेष सूट दिली जात होती. ठराविक रकमेच्या आयात मालावर अमेरिका आयातकर आकारत नव्हती. अमेरिकेच्या जीएसपी योजनेचा भारत सर्वात मोठा लाभार्थी होता. ही योजना विकसनशील देशांसाठी लागू केली होती. यानुसार 1970 पासून भारताला 5.6 अब्ज डॉलर्स म्हणजेच 40 हजार कोटी रुपयांच्या निर्यातीवर सूट मिळत होती. आता जीएसपीतून बाहेर केल्यानंतर भारताला हा फायदा होणार नाही. 

ट्रम्प यांनी अमेरिकन मोटरसायकल हर्ले- डेव्हिडसन मोटारसायकलचे उदाहरण देताना सांगितले की, जेव्हा आम्ही भारतात मोटारसायकल पाठवितो तेव्हा त्यावर 100 टक्के शुल्क आकारले जाते. पण, भारत आम्हाला मोटारसायकल पाठवितो तेव्हा आम्ही काहीच शुल्क आकारत नाही. त्यामुळे हे शुल्क एकसमान असावे. हा मिरर टॅक्स (प्रत्युत्तरातील कर) असेल पण, परस्परांसारखाच असेल.