अखेर ती वाघिण जेरबंद - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अखेर ती वाघिण जेरबंद

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (ब्रम्हपुरी - नागभीड प्रतिनिधी ):

ब्रम्हपुरी वानविभागतील दक्षिण वन परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या हळदा,मुरपार,आवळगाव, वांद्रा, डोर्ली, चीचगाव, व पद्मापुर या गाव परिसरात धुमाकूळ घालून कित्येकांना ठार व जखमी करणाऱ्या मानवी जीवितास घोकादायक ठरलेल्या A1 वाघीनीला अखेर जेरबंद करण्यांत वनविभागाला यश आले.

मा. मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनरक्षक वन्यजीव महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक:-१/३/२०१९ रोजीच्या आदेशानुसार परवानगी दिली होती.त्या अनुषंगाने दिनांक:-६/०३/२०१९ रोजी दक्षिण ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रा अंतर्गत भुज उपक्षेत्रातील मुडझा नियत क्षेत्रामध्ये कक्ष क्र.२२६ दुपारी:-३:१५ वाजता डॉ.रविकांत खोब्रागडे पशुवैद्यकीय अधिकारी RRT ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांनी A1 वाघीनीला डार्टने बेशुद्ध करून जेरबंद केले.

सदरची कार्यवाही सहायक वनरक्षक प्रादेशिक व वन्यजीव ब्रम्हपुरी,वनविभागाचे क्षेत्रीय कर्मचारी तसेच RRT ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प,चंद्रपूरचे सदस्य श्री.अजय मराठे पोलीस शिपाई, श्री.अमोल ताजने,श्री.राहुल धनविजय,श्री.श्रीराम मंगम यांचे उपस्थितीत पार पाडली.

जेरबंद करण्यात आलेल्या A1 वाघीणचे वय अंदाजे 2 वर्ष असून सदर वाघाची वैधकिय तपासणी केल्यानंतर तिला गोरेवाडा प्राणी संग्रहालय व बचाव केंद्र नागपूर येथे हलविण्यात आली.