जागतिक अपंग दिवसाचे औचित्य साधून आत्मनिर्भर दिव्यांगाचा गौरव - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जागतिक अपंग दिवसाचे औचित्य साधून आत्मनिर्भर दिव्यांगाचा गौरव

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

जागतिक अपंग दिवसाचे  औचित्य साधून चंद्रपुरातील निवडक आत्मनिर्भर व सन्मानाने जीवन व्यतीत करणाऱ्या दिव्यांगाचा यथोचित गौरव स्थानिक विकलांग सेवा संस्था चंद्रपूर वतीने सर्वश्री मुन्ना खोब्रागडे ,अजिंक्य चवरे, कोलते,   मिश्रा  ह्या दिव्यांग आत्मनिर्भर व्यक्तीचा भेटवस्तू पुष्पगुच्छ व ग्रंथभेट देऊन सामाजिक कार्यकर्त्या तथा सरपंच उर्जानगर प्रतिभा खन्नाडे सीमा ठाकूर  संगीता ठोसरे   विद्या  चिताडे  ह्यांचे शुभहस्ते  पंचारतीने ओवाळून औक्षवन करण्यात आले  ह्याप्रसंगी सीमा ठाकूर परिवाराचे वतीने वृत्तपत्र रॅक व संस्थापयोगी साहित्य प्रदान करण्यात आले.


पाहुण्यांचे स्वागत मेघा देवराव कोंडेकर भोला राम जी सोनूले प्रसाद पा न्हेरकर इत्यादींनी ग्रंथभेट देऊन केले .

दिव्यांग हे समाजाचे घटक असून त्यांना सन्मानाने जगण्यास सहकार्य करण्याची भूमिका सीमा ठाकूर ह्यांनी विदित केली तर सरपंच प्रतिभा खन्नाडे ह्यांनी दिव्यांग पुनर्वसन निधी देऊन ग्राम पंचायत उर्जानगर द्वारा मोलाचा सहभाग दिला असून भविष्यातही दिव्यांगासा ठी सर्वतोपरी योगदान देण्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमाचे  प्रास्थाविक श्री देवराव कोंडेकर ह्यांनी तर आभार प्रदर्शन  प्रसाद पान्हेरकर ह्यांनी केले 
कार्यक्रमाला स्वाती देवाळकर अंकिता देशट्टीवार खुशाल ठलाल अशोक खाडे ह्यांनी योगदान दिले.