आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा शिवाय पर्याय नाहीएटापल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आढावा बैठक - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा शिवाय पर्याय नाहीएटापल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आढावा बैठक

Share This

-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच जनतेच्या हिताचा:धर्मराव बाबा आत्राम 
खबरकट्टा / गडचिरोली (सेवा वाकडोतपवार):

शेतकरी, कष्टकरी, दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि सबंध जनतेच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेवच  पर्यायी पक्ष असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.


ते मंगळवार 5 मार्च रोजी एटापल्ली येथील  भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात भव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
     
बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा  माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम होते. तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून रा.काँ.चे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, रा.काँ.चे माजी कार्यकारी जिल्हाध्यक्ष बबलू भैय्या हकीम, जि.प.सदस्य ऋषी पोरतेट,एटापल्ली पंचायत समितीचे सभापती बेबीताई लेकामी, रा.काँ.चे एटापल्ली तालुकाध्यक्ष दौलत दहागावकर, रा.काँ.चे अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मुस्ताक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
     
अध्यक्ष स्थानावरून पुढे बोलताना माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, सत्ताधारी केंद्र व राज्यसरकार निव्वळ जुमलेबाजीचे सरकार असून भाजपा हे केवळ श्रीमंतांचे बाहुले बनले असल्याचे आरोप करून देशात व प्रामुख्याने राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा शिवाय पर्याय नसल्याचे आवर्जून सांगून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार व मजबुतीकरणासाठी बूथ कमिटी तयार करून "वन बूथ, टेन युथ" हा उपक्रम प्रत्येक कार्यकर्त्यांनी अंमलात आणावे असे आवाहन यावेळी माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी करून मोदी सरकारने नागरिकांच्या खात्यात अद्याप पर्यंत पंधरा लाख व वर्षाचे दोन कोटी बेरोजगारांना रोजगार दिले नसल्याचे नाराजी व खंत व्यक्त करून सत्ताधारी भाजपा सरकारवर चांगलेच धारेवर धरले. 
     
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी जिल्ह्यात माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसल्याचे सांगून मागच्या निवडणुकीत जनतेनी फार मोठी घोडचूक करून पंचवीस वर्षे आपण मागे गेलो आता त्याची भरपाई करण्यासाठी खंबीरपणे पाठीशी व भरघोस मतांनी निवडून आणा असे आवाहन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय राज्यात आणि जिल्ह्यात पर्याय नसल्याचे त्यांनीही उच्चार करून यावेळी मार्गदर्शन केले. 
     
आढावा बैठकीचे प्रास्ताविक रा.काँ.चे तालुकाध्यक्ष दौलत दहागावकर यांनी केले तर सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार विनोद पत्तीवर यांनी मानले. यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, युवक व युथ,  कार्यकर्ते व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.