विहिरगाव येथील शिपाई पद भरती प्राथमिक चौकशीत सरपंच व सचिव दोषी: मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कारणे दाखवा नोटीस - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विहिरगाव येथील शिपाई पद भरती प्राथमिक चौकशीत सरपंच व सचिव दोषी: मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कारणे दाखवा नोटीस

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (दिपक शर्मा -राजुरा):


राजुरा  तालुक्यातील विहीरगाव ग्रामपंचायतीने शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबविली भरती प्रक्रिया संबंधाने झालेली लेखी परीक्षा नियमबाह्य घेतल्याने काही परीक्षार्थ्यांनी यावर आक्षेप घेतला. तशा प्रकारच्या तक्रारी त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केल्या होत्या या तक्रारीची दखल घेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले. 


प्रथम चौकशी विस्तार अधिकारी पंचायत समिती राजुरा यांनी केली होती परंतु सदर चौकशी अहवाल चुकीचा असल्याने फेरचौकशी करण्याची मागणी अन्यायग्रस्त परीक्षार्थींनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांच्याकडे केली असता उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समिती अधिकारी राजुरा यांच्याकडून आलेला अहवाल व अन्यायग्रस्त परीक्षार्थ्यांच्या अर्जाचे अवलोकन केले असता श्री. एस. के. शेंडे विस्तार अधिकारी पंचायत समिती चंद्रपूर यांना सदर प्रकरणाची चौकशी करून सात दिवसात अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.
    
त्यानुसार दिनांक 24 डिसेंबर रोजी सादर केलेल्या फेर चौकशी अहवालानुसार ग्रामपंचायत विहिरगाव येथील शिपाई पदाच्या भरती संदर्भात घेतलेल्या लेखी परीक्षा ठरलेल्या वेळेत न घेता दुसऱ्याच वेळेत घेणे, अर्जाची छाननी मुदतीपूर्वीच करणे, परीक्षेच्या वेळेस स्वमर्जीने बदल करणे, परीक्षेच्या दिवशी मासिक सभेचे आयोजन करून निवड समितीचे गठन करणे, त्याचवेळी समितीला पेपर काढण्यास मौखिक आदेश देणे, त्याच दिवशी पेपर सेट काढणे व परीक्षेचे आयोजन करणे, उमेदवाराकडून प्राप्त अर्जाची ग्रामपंचायतचे आवक जवकला नोंद न घेणे, परीक्षा प्रवेशपतत्रावर खोडतोड करणे, जावक क्रमांक व दिनांक नमूद न करणे, परीक्षेबाबत निवड समिती ठरविण्यासाठी सभा आयोजित करणे, परंतु प्रत्यक्षात कार्यवृत्त पुस्तिकेत सभेची नोंद नसणे, ग्रामसेवकाची तब्येत बिघडल्यामुळे परीक्षा समोर ढकलणे परंतु ठरावात उल्लेख नसणे इत्यादी बाबी शंकेला वाव निर्माण करून देणारे असून झालेल्या प्राथमिक चौकशी बयानात कुठेहि सातत्य दिसून येत नसल्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केला.
   
चौकशीत व बयानात दिसून आलेल्या तफावतीमुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम-1958 चे कलम 38 पोटकलम (1) नुसार पंचायतीने पारित केलेल्या ठरावाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे ही सरपंच व सचिव या नात्याने आपली जबाबदारी असून शिपाई पदाची भरती प्रक्रिया पंचायतीच्या मान्यतेने पूर्णपणे न राबविल्याने ग्रामपंचायत शिपाई पदाची नेमणूक विधिग्राह्य आहे असे दिसून येत नाही. यावरून आपण नेमून दिलेल्या कर्तव्यात कसूर केल्याने कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर सात दिवसाच्या आत आपला खुलासा गट विकास अधिकारी पंचायत समिती राजुरा यांच्यामार्फततिने सादर करावा अन्यथा आपणास काहीच म्हणायचे नाही असे गृहीत धरून आपल्यावर एकतर्फी कारवाई करण्यात येणार असल्याचे कारणे दाखवा नोटीस दिल्याने सरपंच व सचिवांचे धाबे दणाणले आहे.