रामचंद्रराव धोटे महाविद्यालयात निबंध व वादविवाद स्पर्धा संपन्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रामचंद्रराव धोटे महाविद्यालयात निबंध व वादविवाद स्पर्धा संपन्न

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (चेतन खोके :राजुरा):
रामचंद्रराव धोटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथे आज दिनांक १ मार्च रोजी मा. तहसीलदार, राजुरा यांच्या कार्यालयीन पात्राच्या निर्देशानुसार आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक - २०१९ कार्यक्रम अंतर्गत निबंध व वादविवाद स्पर्धा घेण्यात आल्या.
      
या प्रसंगी ' नव मतदार - लोकशाहीच्या विकासासाठी.' या विषयावर विद्यार्थ्यांनी निबंध लिहले तर ' अध्यक्षीय लोकशाही की संसदिय लोकशाही.' या विषयावर वादविवाद स्पर्धा घेण्यात आली.
       
या प्रसंगी रामचंद्रराव धोटे महाविद्यालये प्राचार्य प्रफुल्ल शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षा विभाग प्रमुख प्रा. निच्छल इटणकर यांनी प्रा. देवानंद चुनारकर, प्रा. समिर पठाण, निश्चल इटणकर, प्रा. सत्यपाल उरकुडे, प्रा. यश्वीनी घोटेकर, प्रा. मधुकर साळवे, प्रा. नरेंद्र धोबे आदी मान्यवर उपस्थित होते.
        
या प्रसंगी निबंध लेखन स्पर्धेत  प्रथम क्रमांक कु. दर्शना मेश्राम, द्वितीय क्रमांक सुरज गुरूनुले आणि तृतीय क्रमांक दिपक देठे यांनी पटकावला तर स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक आदर्श खोब्रागडे , द्वितीय क्रमांक दर्शना मेश्राम आणि तृतीय क्रमांक अजय मडावी या विद्यार्थ्यांनी पटकावले तर स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे परीक्षण प्रा. देवानंद चुनारकर आणि प्रा. यश्वीनी घोटेकर यांनी केले.
        
कार्यक्रमाचे संचालन साक्षी लभाणे तर आभार प्रदर्शन प्रगती कवलकर यांनी केले. 
        
कार्यक्रमाचे आयोजन लोकशाही क्लबच्या माध्यमातून करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रविण बुक्कावार, लिपिक मिथलेश मुनगंटीवार, शिक्षकेतर कर्मचारी मनोज ठाकरे, भुषण चौधरी यासह लोकशाही क्लबच्या विद्यार्थ्यांनी अनमोल सहकार्य केले.