चंद्रपुरात "काँग्रेस का हाथ विनायक बांगडे के साथ ":ऑल इंडिया काँग्रेस कमिटी च्या 7व्या यादीत नाव जाहीर : धानोरकर अपक्ष..??? - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपुरात "काँग्रेस का हाथ विनायक बांगडे के साथ ":ऑल इंडिया काँग्रेस कमिटी च्या 7व्या यादीत नाव जाहीर : धानोरकर अपक्ष..???

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर:

लोकसभा 2019च्या चुरशीत काँग्रेस पक्षा तर्फे जिल्ह्यात नवीन भर पडलीये  काल दिनांक 22 मार्च 2019ला रात्री उशिरा जाहीर झालेल्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटी च्या सातव्या यादीत 35 उमेदवावारांची नावे जाहीर झाली.

त्यात महाराष्ट्रातील चंद्रपूर - वणी - आर्णी लोकसभा क्षेत्राकरिता उमेदवार म्हणून माजी जिल्हा अध्यक्ष विनायक बांगडे यांचे नाव जाहीर झाल्याने बाळू धानोरकर यांच्या संभाव्य काँग्रेस उमेदवारीला थांबा लागला आहे. 

तरीही हा मुत्तेमवारांसारखा एक पब्लिसिटी स्टंट असू शकतो असे काँग्रेस च्या एका मोठ्या गोटातून बोलले जात असून धानोरकर समर्थक एबी फॉर्म हातात येऊन 25मार्च या निवडणुकीचा आवेदन करण्याच्या शेवटच्या दिवशी काय नाट्य रंगेल याकडे डोळे लावून बसले आहे. 

संदर्भात दिल्ली येथे ठाण मांडून बसलेल्या धानोरकर यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दूरध्वनी क्रमांक सतत बंद येत आहे.