लोकसभा निवडणुकांची घोषणा: आज सायंकाळी 5वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

लोकसभा निवडणुकांची घोषणा: आज सायंकाळी 5वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

Share This
खबरकट्टा / राष्ट्रीय बातमी :

लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज संध्याकाळी जाहीर होणार आहे. रविवार 10 मार्चला संध्याकाळी पाच वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे. संपूर्ण देशाचं लक्ष निवडणुकांच्या तारखांकडे लागून राहिलं आहे.


राजधानी दिल्लीत संध्याकाळी पाच वाजता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आज निवडणुकांची घोषणा झाल्यास, त्या क्षणापासून आचारसंहिता लागू होईल.

लोकसभा निवडणुकानियोजित वेळेनुसारच होणार, असं मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं होतं.

भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचा निवडणुकांवर काही परिणाम होणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्यावर 'देशातील लोकसभा निवडणुका वेळेवरच होतील' असं उत्तर अरोरा यांनी दिलं.

निवडणूक आयोगाच्या नवीन अधिसूचनेनुसार उमेदवारांना त्यांच्या परदेशातील मालमत्तेचीही माहिती द्यावी लागणार आहे. आयटी विभाग यामध्ये लक्ष घालणार असून माहितीमध्ये विसंगती आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.

एक लाख 63 हजार 331 मतदान केंद्र, व्हीव्हीपॅट मशिन्स यावेळी वापरली जाणार असल्याची माहितीही निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली. सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी समिती स्थापन करणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.