5 मार्च चा मुहूर्त टळला असला तरी 8 मार्च ला दिल्लीत होणार काँग्रेस पक्ष प्रवेश : उद्धव ठाकरेंचे उपकार विसरणार नाही -आ. सुरेश धानोरकर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

5 मार्च चा मुहूर्त टळला असला तरी 8 मार्च ला दिल्लीत होणार काँग्रेस पक्ष प्रवेश : उद्धव ठाकरेंचे उपकार विसरणार नाही -आ. सुरेश धानोरकर

Share This
खबरकट्टा /नागपूर :

शिवसेनेने आपल्याला खूप काही दिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत यांनी आपल्याला बरीच मदत केली. त्यांच्याबद्दल आपल्या मनात नेहमीच आदराची भावना कायम राहील, असे आमदार धानोरकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आमदार धानोरकर यांचा कॉंग्रेस प्रवेश शुक्रवारपर्यंत लांबला आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार मंगळवारला (ता. 5) कॉंग्रेस प्रवेश होता. परंतु त्यांचा कॉंग्रेस प्रवेश आता येत्या 8 मार्चला दिल्लीत होणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 

"गेल्या लोकसभा निवडणुकीत युतीमध्ये शिवसेना व भाजपाने एकत्र निवडणूक लढविली होती. केंद्रात सत्ता आल्यानंतर भाजपने आपले रंग दाखविण्यास सुरूवात केली. विधानसभा निवडणुकीत भाजपने कोणतेही ठोस कारण न देता शिवसेनेशी युती तोडली. याउपरही शिवसेना नेत्यांनी भाजपच्या सरकारला पाठिंबा दिला." -शिवसेना आमदार सुरेश धानोरकर 

भाजपच्या नेत्यांनी शिवसेना नेत्यांनी योग्य प्रकारे वागणूक दिली नाही. शिवसेनेच्या आमदारांचे विकासाचे प्रकल्पही मंजूर केले नाही, असा आरोपही आमदार धानोरकर यांनी केला.

शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेले उपकार विसरणार नाही, अशा शब्दात शिवसेना आमदार सुरेश धानोरकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. गेली पाच वर्षे भाजपने शिवसेनेला योग्य वागणूक दिली नाही. वारंवार शिवसेना नेत्यांचा अपमान करण्याचे काम भाजपच्या नेत्यांनी केले आहे. भाजपने युतीचा धर्म न पाळल्याने या स्थितीमध्ये पुन्हा भाजपसोबत काम करणे शक्‍य नसल्याने आपण कॉंग्रेससोबत जात असल्याची भूमिका शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर यांनी नागपूर येथे पत्रकारांशी  बोलताना मांडली.