धक्कादायक :दोन भावंडांचा तलावात बुडून मृत्यू - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

धक्कादायक :दोन भावंडांचा तलावात बुडून मृत्यू

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (ब्रम्हपुरी -नागभीड प्रतिनिधी ):

ब्रम्हपुरी तालुक्यातील जुगनाळा येथे , आईसोबत शेतात गेलेल्या 2 चिमुकल्यांचा बुडून मृत्यू,4 ते 7वर्ष वयाची 2 मुले, रात्रभर शोधा-शोध चालु  तलावातुन अखेर 1 वाजता बाहेर काढले मृतदेह बाहेर काढण्यात आले असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.


सविस्तर  वुत्त असे की ,ब्रम्हपुरी तालुक्यातील जुगनाळा येथे दुर्दैवी घटना घडली आहे. स्पंदन जोतिबा मेश्राम वय- (७)  ,व आयुष जोतिबा मेश्राम वय- (४) , अशी मृतक भावंडाचे नावे आहेत. 

रविवारी दुपारी चार वाजता स्पंदन व आयुष आईसोबत गवरला शिवारात असलेल्या शेतात गेले होते. आई शेतात काम करीत असताना. दोघेही भाऊ लगतच(जवळच) असलेल्या तलावावर गेले. तलावात आधीच कुणीतरी मासोळ्या पकडण्यासाठी मच्छरदाणी टाकून ठेवली होती. हे भाऊ त्या मच्छरदाणीत अडकून जागीच मरण पावले. या घटनेबाबत गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.