देशात 17 व्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू : 7 टप्प्यात मतदान : 23मे रोजी मतमोजणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

देशात 17 व्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू : 7 टप्प्यात मतदान : 23मे रोजी मतमोजणी

Share This
वाचा निवडूक आयोगाच्या पत्रकार परिषदेचा संपूर्ण वृत्तांत : 

खबरकट्टा / राष्ट्रीय बातमी :

सतराव्या लोकसभेसाठी सात टप्प्यांत मतदान होईल. मुख्य निवडणूक आयुक्तांनी ही घोषणा केली. मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. 11 एप्रिलला मतदानाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात. दुसरा टप्पा 18 एप्रिल, तिसरा टप्पा 23 एप्रिल, चौथा टप्पा- 29 एप्रिल, पाचवा टप्पा -6 मे, सहावा टप्पा - 12 मे, सातवा टप्पा-19 मे अशा टप्प्यांत मतदान होईल.

यांपैकी चार टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात मतदान होणार आहे.
11 एप्रिल - 7 जागा
18 एप्रिल - 10 जागा
23 एप्रिल - 14 जागा
29 एप्रिल - 17 जागा 

लोकसभा निवडणुकीची घोषण होताचा देशात अचारसंहितेचीही अंमलबजावणी सुरू झाली आहे. व्हीव्हीपॅटचा वापर सर्व मतदान केंद्रात होणार आहे. अंचासंहिता भंग झाली तर कडक कारवाई करण्याचा इशारा आयोगाने दिला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील आरोरा यांनी ही घोषणा केली. केंद्रीय निवडणूक आयोग दिल्लीच्या विज्ञान भवनात पत्रकार परिषद झाली. पहिल्या टप्प्यात 20 राज्यांतील 91 मतदारसंघ, दुसऱ्या टप्प्यात 14 राज्यांतील 97 मतदारसंघ, 3ऱ्या टप्प्यात 14 राज्यातील 115 मतदारसंघ, 4थ्या टप्प्यात 9 राज्यातील 71 मतदारसंघ, 5व्या टप्प्यात 7 राज्यांत 51 मतदारसंघ, 6व्या टप्प्यात 7 राज्यातील 59 मतदारसंघात आणि 7 व्या टप्प्यात 8 राज्यातील 59 मतदासंघात मतदान होईल.

आंध्र, अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, सिक्कीम, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तराखंड, अंदमान-निकोबार, दादरा-नगरहवेली, दमण-दीव, लक्षद्वीप, दिल्ली, चंदीगडमध्ये एकाच टप्प्प्यांत मतदान होणार 

या लोकसभेचा कार्यकाल 3 जूनला संपणार आहे. 17 व्या लोकसभेसाठी गेली काही दिवस मोठी तयारी सुरू आहे, असं त्यांनी सांगितली. विविध राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला आहे, असं त्यांनी सांगितलं. रेल्वे, गृहसचिव, विविध राज्यांना भेटी दिल्या आहेत, त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्तांनी माहिती दिली. निवडणुकांच्या तारखा निश्चित करताना मुलांच्या परीक्षा, सण, उत्सव, सांस्कृतिक बाबी, हवामान असे मुद्दे विचारात घेतले आहेत, असं ते म्हणाले.

देशात यावेळी 10 लाख मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहेत. आवश्यकतेनुसार मतदान केंद्रात वाढ करण्यात येणार आहे. निवडणुकीमध्ये 90 कोटी मतदार मतदान करतील. यातील 15 दशलक्ष मतदार 18 ते 19 वयोगटातील आहेत. 2014 च्या तुलनेत 7 कोटी मतदार वाढले असल्याची माहिती अरोरा यांनी दिली. निवडणुकीत एकूण 17.4 लाख व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. संवेदनशील भागांमध्ये CAPF चे जवान तैनात केले जातील.  मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी निवडणूक आयोगाचा हेल्पलाईन नंबर-1950 कार्यरत असेल.

रात्री 10 ते सकाळी 6 वेळेत ध्वनिप्रक्षेपकांच्या वापारावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. शिवाय अंचारसंहिता भंगाची तक्रार देण्यासाठी अँड्रॉईड अॅपही देण्यात येणार आहे. या अॅपवर तक्रार करताना तक्रारकर्त्यांना आपलं नाव, संपर्क क्रमांक सांगावा लागेल. 100 मिनिटांत संबंधित अधिकाऱ्यांकडून उत्तर मिळेल.

सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या जाहिरातींचीही नोंद ठेवली जाणार आहे.