अखेर गोंडपिंपरी नगर पंचायत च्या 10 कोटी रु .पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन सम्पन्न: सर्व शहर वासियांना शुद्ध पाणी मिळण्याच्या मार्ग मोकळा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अखेर गोंडपिंपरी नगर पंचायत च्या 10 कोटी रु .पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन सम्पन्न: सर्व शहर वासियांना शुद्ध पाणी मिळण्याच्या मार्ग मोकळा

Share This
 खबरकट्टा / चंद्रपूर (गोंडपिपरी शहर प्रतिनिधी):

गोंडपिपरी नगर पंचायतीच्या 10 कोटी पाणीपुरवठा योजनेचे रखडलेले भूमिपूजन नगरसेवकांच्या अनेक मानापमानाच्या नाट्यानंतर आज दिनांक 10 फेब्रुवारी ला पार पडले. 


भाजपा नागराध्याक्ष्यांच्या कालखंडात पालकमंत्र्यांनी विशेष निधी म्हणून 10 कोटीचे  पॅकेज जाहीर केले होते. या कामाचे कंत्राट सुद्धा होऊन नांदेडच्या संतोष कंस्ट्रक्टशन ला देण्यात आले.समोर असणाऱ्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्ष्यात घेता 8 मार्च ला तातडीने सर्वसहमतीने भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता परंतु विद्यमान काँग्रेस  नागराध्यक्ष्याच्या हेकेखोर पणामुळे नेहमीप्रमाणे मतभेदाला सामोरे जात उपाध्यक्ष, सर्व सभापती व नगरसेवकांनी कार्यक्रमावर बहिष्कार घातल्यामुळे वेळेवर कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. 

राजकीय वादात विकास कामे रोखू नका अश्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार आज अखेर नगराध्यक्षाना डावलून उपाध्यक्ष व पाणीपुरवठा सभापती यांनी पुढाकार घेत भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पाडला. 

कार्यक्रम प्रसंगी पाणीपुरवठा सभापती राकेश पुन, बांधकाम सभापती चेतनसिंग गौर, माजी अध्यक्ष संजय झाडे, नगरसेवक किरण नगारे, सविता पुणेकर, अश्विन कुसनाके, जितेंद्र इटेकर, सुरेश चरडे, भाजपा तालुका अध्यक्ष बबन निकोडे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील संकुलवार, बंटी बोनगिरवर, रवी पावडे सहित कंत्राटदार व नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.