भटाळी खुल्या कोळसा खाणीत स्फोट होऊन कामगार जखमी : पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भटाळी खुल्या कोळसा खाणीत स्फोट होऊन कामगार जखमी : पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्ह्यातील भटाडी येथील खुल्या खाणीमध्ये डेटोनेटरचा स्फोट होऊन वेकोलि कामगार रमेश बालाजी इटनकर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. 


या घटनेमुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण असून वेकोली प्रशासनाचे कामगार सुरक्षेवर पुन्हा एकदा दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. 

चंद्रपूर येथून काही किलोमीटर अंतरावर भटाडी खुल्या कोळसा खाणी  मध्ये स्फोटासाठी डेटोनेटरचा वापर केला जातो, दरम्यान कामगार रमेश इटनकर डेटोनेटर असलेला बॉक्स घेऊन जात असताना अचानक मोठा स्फोट झाला, या स्फोटामध्ये इटनकर गंभीररीत्या जखमी झाले. घटनेनंतर इतर कामगारांनी इटनकर यांना वेकोली रुग्णालयात दाखल गेले. त्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले.

 या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आमच्या प्रतिनिधींनी सब एरिया मॅनेजर परिहार  व तिथले प्रोडक्शन मॅनेजर ताजने यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची  उत्तरे देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला या पूर्वी ही भटाळी खदान मध्ये एक कामगार गड्ड्यात घुसला होता व तेव्हा ही वेकोली प्रशाशनाने ही गंभीर बाब उघडकीस येऊ दिली नाही.ह्या सतत होणाऱ्या अपघातांमुळे वेकोली प्रशासन सुरक्षा यंत्रणेविषयी किती जागृत आहे,अशी चर्चा वेकोली कामगारांमध्ये सुरु आहे.